पुणे : गेल्या ४० दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकारचा रखडलेला बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळ विस्तार अखेर काल (मंगळवारी)राजभवनात पार पडला. या वेळी भाजप व शिंदेसेनेच्या प्रत्येकी ९ अशा एकूण १८ आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील सर्वचं मंत्री कोट्याधीश आहेत.
भाजपच्या १२, सेनेच्या २ आणि शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या २ अशा १६ महिला सत्ताधारी पक्षात असताना पहिल्या मंत्रिमंडळात एकाही महिलेस मंत्रिपद मिळाले नाही. भाजपचे १०६ आमदार असूनही शिंदेसेनेकडे ४० व १० अपक्ष असताना पहिल्या विस्तारात भाजप आणि शिंदे गटाला ९-९ मंत्रिपदे मिळाल्याने शिंदेच वरचढ राहिले आहे.
कोट्याधीश असलेला मंत्री..
मंत्रिमंडळातील 18 मंत्र्यांपैकी सर्वाधिक संपत्ती म्हणजे कोट्याधीश असलेला मंत्री म्हणजे भाजपचे मंगलप्रभात लोढा हे आहेत. त्यांच्याकडे 441 कोटी रुपयांची संपत्ती आहे. बांधकाम व्यावसायिक असलेले मंगलप्रभात लोढा यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे 441 कोटींची संपत्ती आहे.
सहा वेळी आमदार राहिलेले मंगलप्रभात लोढा यांच्याकडे 252 कोटींची रोकड आणि दागदागिन्यां स्वरुपातील आणि 189 कोटी रुपयांची स्थावर (बंगला, प्लॅट) मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्या नावे मुंबईत पाच प्लॅट आहेत. लोढांविरोधात आत्तापर्यंत 5 गुन्हे दाखल आहे.
सर्वात गरीब मंत्री
सर्वात गरीब आमदार म्हणून पैठणचे आमदार संदीपान भुमरे यांच्या नाव येते. शिंदे गटाचे संदीपान भुमरे हे 2 कोटींच्या संपत्तीसह मंत्रिमंडळातील सर्वात गरीब आमदार आहेत. मागील 35 वर्षांतून भुमरे शिवसेनेसाठी काम करत आहेत.
एकनाथ शिंदे समर्थक तानाजी सावंत यांच्याकडे लोढा यांच्याखालोखाल 115 कोटींची संपत्ती आहे. तर तिसऱ्या स्थानी सावंतवाडीचे आमदार आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर आहेत.त्यांच्याकडे 82 कोटींची संपत्ती आहे.
भाजपच्या विजय गावित यांच्याकडे 27 कोटींची संपत्ती आहे,
गिरीश महाजन यांच्याकडे 25 कोटी
राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 24 कोटी
अतुल सावे यांच्याकडे 22 कोटी
सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे 11 कोटी
शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे 20 कोटी
शंभुराज देसाई यांच्याकडे 14 कोटी
दादा भुसे यांच्याकडे ११ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
शिंदे फडणवीस मंत्रिमंडळतील एक मंत्री दहावी पास आहे, दुसरा थेट डॉक्टरेट पदवी संपादन करणार आहे.
18 मंत्र्यांपैकी 5 मंत्री बारावी पास आहेत
एक मंत्री इंजिनीअर, सात मंत्री पदवीधर आहे.
दोन मंत्र्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे.
एका मंत्र्याने डॉक्टरेट पदवी मिळवली आहे,
भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे हे सर्वोच्च शिक्षण घेतलेले मंत्री
१० मंत्री साठी ओलांडलेले
पहिल्या मंत्रिमंडळात २० पैकी ९ मंत्री मराठा समाजातील आहेत. मंत्रिमंडळात १० मंत्री वयाची साठी ओलांडलेले आहेत, तर ९ जण पन्नाशी पार केलेले आहेत.
12 मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्हे
18 मंत्र्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमीवर नजर टाकली तर आपल्याला प्रत्येक मंत्र्यांबाबत थक्क करणारी माहिती मिळते. या 18 मंत्र्यांपैकी जवळपास 12 मंत्र्यांविरोधात राजकीय, गुन्हेगारी स्वरुपातील गुन्हे दाखल आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.