तब्येत सुधारतेयं म्हणून ८४ वर्षीय पठ्यानं घेतले कोरोना लशीचे ११ डोस

आपल्याला वेगवेगळ्या वेळी कोरोना लस घेता यावी यासाठी या महोदयांनी आपला मोबाईल क्रमांकही बदलला.
Brahmadev Mandal

Brahmadev Mandal

sarkarnama

नवी दिल्ली : देशभराचा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तिसऱ्या लाटेच्या संकटात अनेक जण बुस्टर डोस घेण्याच्या प्रयत्नात आहेत. एका व्यक्तीने आरोग्य व्यवस्थित राहावे, म्हणून अकरा डोस (covid vaccine) घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आपल्याला वेगवेगळ्या वेळी कोरोना लस घेता यावी यासाठी या महोदयांनी आपला मोबाईल क्रमांकही बदलला.

कोरोनाच्या सुरवातीच्या काळात लस घेण्यासाठी नागरिकांची धडपड सुरु होती, अपुऱ्या पुरवठ्यामुळे अनेक जण लस घेण्यापासून वंचित होते. आता लशीचा पुरवठा व्यवस्थित होत असल्याने लसीकरण मोहिम आपले उद्दिष्ट गाठत आहेत. ''कोरोना लस घेतल्याने बरे वाटते आणि प्रकृती सुधारते. शरीराला असलेल्या विविध प्रकारच्या व्याधींपासून आराम मिळतो,' एका व्यक्तीने दोन नव्हे तर अकरा डोस घेतले. बाराव्या डोससाठी त्यांनी नोंदणी केली. पण लसीकरण केंद्राची वेळ संपल्याने त्यांना डोस घेता आला नाही, यावेळी हा प्रकार समोर आला.

बिहारमधील (Bihar) ८१ व्यक्तींनी हा प्रताप केला आहे. ब्रह्मदेव मंडल (रा. उदाकिशुनगंज, जि. मधेपुरा) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणाची चैाकशी या परिसरातील वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. ''ऑफलाईन कँम्पमध्ये लोक अशा प्रकारची गडबड करतात. ऑनलाईन कँम्पमध्ये त्यांना असे करता येत नाही. कारण ऑफलाईन केंद्रांवर केवळ मोबाईल नंबर आणि आधार नंबरच घेतला जातो. हे क्रमांक नंतर कॉम्पूटरमध्ये फिड करतात. हे क्रमांक फीड करताना अनेकदा मॅच होत नाहीत. त्यामुळे ते बादही ठरतात, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं.

<div class="paragraphs"><p>Brahmadev Mandal</p></div>
आता मंत्रालयाचा नवीन पत्ता शिवतीर्थ..

''कोरोना लस घेतल्याने बरे वाटते आणि प्रकृती सुधारते. शरीराला असलेल्या विविध प्रकारच्या व्याधींपासून आराम मिळतो,'' असा अजब दावा ब्रह्मदेव मंडल यांनी केला आहे. त्यांनी 10 कोरोना डोस त्यांनी खगडिया जिल्ह्यातील परबत्ता येथे घेतला. 11 वा डोस त्यांनी भागलपूर येथील कहलगाव येथे घेतला. त्यांनी 13 फेब्रुवारी 2021 पासून आतापर्यंत 11 वेळा कोरोना लस घेतली आहे.

भारतात कोव्हिड 19 च्या तिसऱ्या लाटेचा पीक पॉईंट जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात बघायला मिळण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी व्यक्त केलाय. महाराष्ट्रात जानेवारी महिन्याच्या मध्यात कोरोनाची सर्वाधिक रुग्णवाढ बघायला मिळण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आलाय. भारतीय विज्ञान संस्था आणि भारतीय सांख्यिकी संस्था बंगळुरु यांनी केलेल्या संशोधनातून हा दावा करण्यात आलाय.

<div class="paragraphs"><p>Brahmadev Mandal</p></div>
आघाडी सरकारमध्ये मान-सन्मान नाही ; शिवसेनेच्या माजी आमदाराकडून घरचा आहेर

मार्च महिन्याच्या सुरुवातीला कोरोना संसर्गाची तिसरी लाट कमी होण्यास सुरुवात होण्याचा अंदाजही तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तज्ज्ञांकडून संशोधनाच्या मॉडेलनुसार संसर्ग, लसीकरण आणि कमी होत जाणारी प्रतिकारशक्ती विचारात घेत अंदाज बांधण्यात आलाय, ज्यामुळे लोकसंख्येच्या 30 टक्के, 60 किंवा 100 टक्के लोकं कोविड 19 विषाणूने संक्रमित झालेली असतील. संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेतील व्हेरियंटचा वापर करत अभ्यास केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com