ED Summons Lalu Prasad: ED कडून आज माजी मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबाची होणार झाडाझडती; काय आहे प्रकरण

ED Summons Lalu Yadav Family: लालू प्रसाद यादव यांची उद्या चौकशी होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराला ईडीने नोटीस पाठवली आहे.
ED Summons Lalu Yadav Family
ED Summons Lalu Yadav FamilySarkarnama
Published on
Updated on

बिहारची राजधानी पाटना येथून मोठी बातमी समोर येत आहे. माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांना आज ईडीने चौकशीसाठी बोलवलं आहे. जमीन द्या, नोकरी घ्या, या प्रकरणात राबडी देवी यांची चौकशी होत आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, राबडी देवी यांचे सुपुत्र तेजप्रताप यादव आज चौकशी होणार आहे. तर लालू प्रसाद यादव यांची उद्या चौकशी होण्याची शक्यता आहे. जमिनीच्या बदल्यात नोकरी देण्याचे आमिष दाखवल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्या परिवाराला ईडीने नोटीस पाठवली आहे.

ED Summons Lalu Yadav Family
Nagpur Violence: नागपूर का पेटलं? स्थानिक भाजप आमदाराचा मोठा दावा; प्रत्यक्षदर्शींनी काय अनुभवलं

यापूर्वीही 29 जानेवारी रोजी ईडीने लालू प्रसाद यादव यांची या प्रकरणी 10 तास चौकशी केली होती. वर्षभरापूर्वी तेजप्रताप यांची चौकशी झाली होती. आज आई सोबत त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे.

दिवसेंदिवस लँड फॉर जॉबच्या प्रकरणात लालू यादव यांच्या अडचणी वाढतच आहेत. यापूर्वी सीबीआयच्या पथकाने लालू यादव यांची दिल्लीत चौकशी केली होती. याआधी सीबीआयने या प्रकरणात लालूप्रसाद यादव आणि राबडीदेवी यांचीही चौकशी केली होती

ED Summons Lalu Yadav Family
MLC Election : "मी कोणाचं उष्ट खात नाही" : शिंदेंकडून उमेदवारी जाहीर होताच रघुवंशींचा 'तो' व्हिडिओ व्हायरल

काय आहे प्रकरण

२००४ ते २००९ मधील हा प्रकार आहे. लालू प्रसाद यादव तेव्हा रेल्वेमंत्री होते. त्यांनी आपला पदाचा गैरउपयोग करुन १२ जणांना रेल्वेत ग्रुप डीमध्ये नोकरी दिली होती. यातील सात जणांना जमीनीच्या बदल्यात नोकरी दिल्याचे चौकशीत आढळले आहे.

रेल्वेचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक सौम्या राघवन, सीपीओ कमलदीप मैनराय, लाभार्थी राजकुमार सिंह, मिथिलेश कुमार, अजय कुमार, संजय कुमार, धर्मेंद्र कुमार, विकास कुमार, अभिषेक कुमार रवींद्र राय, किरण देवी, अखिलेश्वर सिंह, रामाशीष सिंह याचा या प्रकरणात समावेश आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com