
Tej Pratap Yadav Love Story Controversy: राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या ज्येष्ठ पुत्र तेजप्रताप यादव यांनी रविवारी बारा वर्षांपासून असलेली आपली प्रेमकहानी जगजाहीर केली. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी आपल्या पुत्राची घरातून अन् पक्षातून हकालपट्टी केली आहे. आता घर अन पक्षातून बेदखल झालेले तेजप्रसाद यादव काय निर्णय घेतात, याकडे बिहारच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
तेजप्रताप यादव यांनी धारण केलेल्या मौनामुळे सस्पेन्स वाढलं आहे. त्यांचे पुढचं पाऊल काय असणार याकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे लालू प्रसाद यादव यांचे दुसरे पुत्र हे तेजस्वी हे आपल्या कुटुंबांने घेतलेल्या निर्णयासोबत आहे. अशातच तेज प्रताप यांची लव्हस्टोरी समजल्यानंतर ते आता काय निर्णय घेणार, या प्रश्नानं बिहारच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
बिहारमध्ये यावर्षी विधानसभेच्या निवडणुका आहेत. या पार्श्वभूमीवर तेजप्रताप शांत बसणार नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. ते मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारी असल्याचे बोलले जाते. राजदचे दरवाजे बंद झाल्यावर तेजप्रताप नव्या पक्षाची घोषणा करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या कुठलेही राजकीय भाष्य न करणारे, मौनात असलेले तेजप्रताप काहीतरी नवीन मोठा निर्णय घेण्याच्या तयारी असल्याची माहिती आहे. नवा पक्ष स्थापन करण्याच्या विचारात असल्याचे समजते. दोन नावाचा ते विचार करीत आहेत. एक नाव आहे, डीडीएस म्हणजे धर्मनिरपेक्ष सेवक संघ आणि दुसरे सीजेपी म्हणजे छात्र जनशक्ती परिषद.
राजदचे ज्येष्ठ नेते लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव यांचे मोठ बंधू असलेले तेजप्रताप यादव यांनी जर नवीन पक्ष काढला तर यापैकी एक नावावर ते शिक्कामोर्तब करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात ते धर्मनिरपेक्ष सेवक संघ हा पक्ष काढावा किंवा युवाशक्तीला एकत्र करुन छात्र शक्ति परिषद स्थापन करावी, या विचारात ते आहेत. लाल प्रसाद यादव यांना आपल्या विवाहित मुलाचे प्रेमकरण समजल्यानंतर त्यांनी त्यांची पक्षातून आणि घरातून हकालपट्टी केली आहे. या निर्णयामुळे तेजप्रताप यांना मोठा धक्का बसला आहे.
दोन दिवसापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर आपल्या लव्हस्टोरी शेअरी केली होती. अनुष्का यादव हिच्यासोबतच्या रिलेशनशिपबाबत असल्याची माहिती त्यांनी दिली. 12 वर्षांपासून अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे केले. काही वेळात त्यांनी ती पोस्ट डिलीट करत आपले अकाऊंट हॅक झाल्याचे सांगितले. पण यांची दखल लालू प्रताद यादव यांनी घेतली.
बिहारच्या विधानसभा निवडणुका तोंडावर असताना तेजप्रसाद यांची झालेली हकालपट्टी त्यांच्या जिव्हारी लागली आहे. राजदमध्ये आपल्याला उपेक्षित ठेवल्याचा आरोप यापूर्वी त्यांनी अनेकवेळा केला आहे. आपला लहान भाऊ तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वावर शंका उपस्थित करीत त्यांच्या विरोधात विधाने केली आहेत.
स्वतःला 'कृष्ण'तर तेजस्वी यांना 'अर्जून'संबोधत त्यांनी यापूर्वी राजदच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. वादग्रस्त विधानामुळे त्यांनी आपल्या परिवाराला आणि पक्षाला अडचणीत आणले आहे. पक्षातून सहा वर्ष हकालपट्टी झाल्यानंतर नवा पक्ष स्थापन करणे हाच त्यांच्यासमोर पर्याय असल्याचे बोलले जाते. आपलं स्वत:चं 'नेटवर्क' तयार करण्याची त्यांची इच्छा आहे.
RSSच्या विरोधात त्यांनी 2015 मध्ये DSSची स्थापना केली आहे. या धर्मनिरपेक्ष सेवक संघाच्या माध्यमातून आपल्याला आरएसएसला आव्हान देता येईल, असे त्यांचे मत आहे. तर 2021 त्यांनी सीजेपी म्हणजे छात्र जनशक्ति परिषदेची स्थापना केली आहे.
तेजप्रताप यांचा यापूर्वीच 2018 मध्ये बिहारचे माजी मुख्यमंत्री दरोगा राय यांची नात ऐश्वर्यासोबत विवाह झाला होता. पण सहा महिन्यांतच तेजप्रताप यांनी घटस्फोटासाठी कोर्टात धाव घेतली होती.अजूनही घटस्फोट झालेला नाही. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.