CDS रावत यांच्या निवासस्थानी कडक सुरक्षा, कार्यक्रम रद्द करुन राष्ट्रपती दिल्लीला

CDS बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी अपघात
Bipin Rawat
Bipin RawatSarkarnama
Published on
Updated on

कुन्नूर (तमिळनाडू) : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांच्या हेलिकॉप्टरला आज दुपारी १२ वाजून ४० मिनीटांनी तमिळनाडूतील कुन्नूरजवळ अपघात झाला. या अपघातात रावत (Bipin Rawat) त्यांच्या पत्नी मधूलिका यांच्यासह व अन्य काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वायूसेनेने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. तर या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती तमिळनाडूचे वनमंत्री रामचंद्रन यांनी दिली आहे.

या अपघातातनंतर दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. रावत यांच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच काही वेळापूर्वी देशाचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनीही रावत यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी रावत यांच्या कुटुंबियांना दुर्घटनेची माहिती दिली असून या आणीबाणीच्या प्रसंगी संपुर्ण देश रावत यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करत असल्याचा विश्वास दिला असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. यानंतर राजनाथसिंग संसदेत पोहचले असून संध्याकाळी ५ वाजता ते या घटनेबाबत लोकसभेत निवेदन सादर करणार आहेत.

Bipin Rawat
हेलिकॉप्टर अपघात : रावत यांच्यासह काही जण जखमी, चार जणांचा मृत्यू

तर राष्ट्रपती रामनाथ कोविंदही मुंबईतील आपला नियोजित कार्यक्रम रद्द करुन दिल्लीला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज संध्याकाळी ४ वाजता राजभवनात नवीन बांधण्यात आलेल्या दरबार हॉलचे उदघाटन करण्यात येणार होते. मात्र हा कार्यक्रम स्थगित करुन ते दिल्लीला गेले आहेत.

Bipin Rawat
सर्जिकल स्ट्राईक आणि २६/११ चे मैदान : अपघातग्रस्त MI-17V5 ची वैशिष्ट्ये

रावत यांच्यासोबत ब्रिगेडियर एल. एस. लिड्डर, लेफ्टनंट कर्नल हरजिंदर सिंग, नायक गुरूसेवक सिंग, नायक जितेंद्र सिंग, लान्सनायक विवेक कुमार, लान्सनायक बी. साई. तेजा, हवालदार सतपाल हेही असल्याची माहिती समोर आली आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच पेट घेतला. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. त्यावेळी स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात नेल्याचे समजते. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह घटनास्थळावर जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com