हेलिकॉप्टर अपघात : रावत यांच्यासह काही जण जखमी, चार जणांचा मृत्यू

भारतीय हवाई दलाने घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.
Bipin Rawat
Bipin RawatSarkarnama
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडतील कुन्नूर येथे अपघात झाल्याचे वृत्त आहे. रावत व अन्य काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांना किती दुखापत झाली आहे, याबाबत माहिती मिळालेली नाही.

या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्यासोबत अन्य 14 जण असल्याचे समजते. प्राथमिक माहितीनुसार, चार जणांचा मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात यश आलं आहे. या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्या पत्नी मधुलिका व काही कुटुंबीय, अधिकारी प्रवास करत होते, अशी माहिती आहे. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर लगेच पेट घेतला. तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे.

अपघातानंतर हेलिकॉप्टर जळून खाक झाले आहे. जवळच्या नागरिकांना तातडीने बचाव कार्य सुरू केले. त्यांनीच दोघांचे मृतदेह बाहेर काढल्याचे समतजे. ते 80 टक्के भाजल्याची माहिती आहे. लष्कराचे अधिकारी तिथे दाखल झाले असून बचावकार्याला वेग आला आहे. भारतीय हवाई दलाने घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

Summary

प्राथमिक माहितीनुसार रावत हे जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. रावत यांच्यासह अन्य काही जणांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथसिंह घटनास्थळावर जाणार असल्याचे समजते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com