नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सोमवारी (२१ मार्च) राष्ट्रपती भवनात वर्ष 2022 साठीचे दोन पद्मविभूषण, आठ पद्मभूषण आणि 54 पद्मश्री पुरस्कार प्रदान प्रदान करण्यात आले. पद्म पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात. या समारंभात राधेश्याम आणि जनरल बिपिन रावत (मरणोत्तर) यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. तर कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद, गायिका गुरमीत बावा (मरणोत्तर), एन. चंद्रशेखरन, देवेंद्र झाझरिया, राशीद खान, राजीव महर्षी, डॉ. सायरस पूनावाला आणि सच्चिदानंद स्वामी यांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले.
दिवंगत जनरल बिपिन रावत यांच्या मुली कृतिका आणि तारिणी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा पुरस्कार स्विकारला. त्याचवेळी गीता प्रेसचे दिवंगत अध्यक्ष राधेश्याम यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ८ डिसेंबर रोजी भारतीय लष्कराचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) प्रवास करत असलेल्या लष्करी हेलिकॉप्टरला तमिळनाडूतील कुन्नूर येथे अपघाती निधन झाले. ते व्हिआयपी हेलिकॉप्टरने कोईंबतूरहून दिल्लीला निघाले होते. मात्र कुन्नर येथे पोहचल्यानंतर त्यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला.
अपघात झाला त्यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या पत्नी मधुलिका रावत यांच्यासह आणखी १४ सहकारीही प्रवास करत होते. या अपघातात काहींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सीडीएस बिपीन रावत यांना तातडीने तामिळनाडूच्या लष्करी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान बिपीन रावत यांचे निधन झाले.
एएनआयच्या वृत्तानुसार, राधेश्याम खेमका यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रात पद्मविभूषण (मरणोत्तर) देण्यात आला. राधेश्याम खेमका यांचे पुत्र कृष्ण कुमार खेमका यांना राष्ट्रपती कोविंद यांनी त्यांचा पुरस्कार प्रदान केला. याशिवाय राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेते देवेंद्र झाझरिया यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुसरीकडे, SII चे MD सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. यात दोन जणांना पद्मविभूषण, आठ जणांना पद्मभूषण आणि ५४ जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. या चार लोकांमध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत, भाजप नेते कल्याण सिंह, गीता प्रेस गोरखपूरचे अध्यक्ष राधेश्याम खेमका आणि शास्त्रीय संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या प्रभा अत्रे यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. याशिवाय एकूण 124 जणांना पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.