डॉ. सायरस पूनावाला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण 2022 पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ पूनावाला सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक आहेत. लस निर्मितीत आघाडीवर असलेल्या सिरमचे भारताच्या कोविड विरोधातील लढाईत मोठे योगदान आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते उद्योजक आणि टाटा सन्स कंपनीचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना पद्मभूषण पुरस्कार 2022 प्रदान करण्यात आला. व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कामगिरीसाठी एन. चंद्रशेखरन यांचा गौरव त्यांना पद्मभुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा वैद्यकीय (औषध) क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार 2022 सन्मानित करण्यात आले. सर्पदंश आणि विंचूदंशावरील उपचार आणि संशोधनासंदर्भात जागतिक मान्यता मिळाली आहे. तसेच ते रायगडमध्ये गरजूंना सेवा देत आहेत.
डॉ. विजयकुमार विनायक डोंगरे यांचा वैद्यकीय (औषधी) क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार 2022 ने गौरव करण्यात आला. सामाजिक सेवेच्या माध्यमातून कुष्ठरोगींवरील उपचारासाठी आयुष्य समर्पित केले आहे.
PIB Maharashtraडॉ. अनिल कुमार राजवंशी यांचा विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले. गेल्या तीन दशकांपासून ते निंबकर कृषी संशोधन संस्थेच्या (NARI) माध्यमातून ग्रामीण विकासासाठी कार्य करत आहेत.
डॉ. भीमसेन सिंघल यांचा वैद्यकीय (औषध) क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्कार 2022 ने गौरव करण्यात आला. डॉ सिंघल यांनी मल्टीपल सेलेरोसिस आणि पार्किसन्स आजारावरील उपचारासंदर्भात केलेल्या कार्याबद्दल जागतिक मान्यता मिळाली आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.