Loksabha Election Result : घटस्फोटीत नवरा-बायकोचा लोकसभा निवडणुकीत 'निकाल', कोण जिंकलं?

Sujata Mandal Saumitra Khan : सुजाता यांना तब्बल 6 लाख 74 हजार 563 मतं मिळाली. तर, सौमित्र खान यांना सहा लाख 80 हजार 130 मतं मिळाली.
Saumitra Khan, Sujata Mondal
Saumitra Khan, Sujata MondalSarkarnama
Published on
Updated on

Lok Sabha Election result : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमुल काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढत झाली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला 29 जागा मिळाल्या तर भाजपला अवघ्या 12. मात्र, विष्णुपुरी मतदारसंघातील पूर्वश्रमीच्या पती-पत्नी असणारे भाजपचे उमेदवार सौमित्र खान विरुद्ध तृणमूल काँग्रेसच्या सुजाता मंडल यांच्यातील लढत देशभर चर्चेत राहिली.

या निवडणुकीत सौमित्र खान यांनी सुजाता मंडल यांचा 5 हजार 567 मतांनी पराभव केला. 2010 मध्ये सौमित्र हे काँग्रेसमध्ये होते. त्यावेळी त्यांची ओळख सुजाता यांच्याशी झाली.

सौमित्र यांनी काँग्रेसला Congress रामराम करत 2014 मध्ये तृणमुल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी सुजाता यांनी देखील तृणमुलमध्ये प्रवेश केला. तृणमूलमध्ये असताना दोघांनी लग्न केले.

Saumitra Khan, Sujata Mondal
Yogi Adityanath : CM योगी मोहन भागवतांना भेटणार; निवडणूक निकालानंतर पहिल्याच भेटीने चर्चांना उधाण...

सुजाता यांना तब्बल 6 लाख 74 हजार 563 मते मिळाली. तर, सौमित्र खान यांना सहा लाख 80 हजार 130 मतं मिळाली. बसपाच्या उमेदवाराला 9 हजार 79 मतं होती. तर, तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सीपीएमच्या उमेदवाराला 1 लाख 54 हजार 11 मतं होती.

सौमित्र यांनी भाजपमध्ये BJP प्रवेश केला होता. एका कार्यक्रमात सौमित्र यांनी सुजाता यांना घटस्फोट देणार असल्याचे जाहीर केले होते. दोघांनी घटस्फोट घेतला होता. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दोघेही समोरासमोर आले. सौमित्र यांच्या विरोधात सुजाता तृणमूल काँग्रेसकडून उमेदवार होत्या. तर सौमित्र हे भाजपकडून विद्यमान खासदार उमेदवार होते.

Saumitra Khan, Sujata Mondal
Yogi Adityanath : CM योगी मोहन भागवतांना भेटणार; निवडणूक निकालानंतर पहिल्याच भेटीने चर्चांना उधाण...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com