Yogi Adityanath : CM योगी मोहन भागवतांना भेटणार; निवडणूक निकालानंतर पहिल्याच भेटीने चर्चांना उधाण...

Lok Sabha Election Result Uttar Pradesh BJP RSS Mohan Bhagwat : गोरखपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्वाचे प्रशिक्षण सुरू असून यादरम्यान योगी आदित्यनाथ आणि मोहन भागवत यांची भेट होणार असल्याचे समजते.
Yogi Adityanath, Mohan Bhagwat
Yogi Adityanath, Mohan BhagwatSarkarnama

Uttar Pradesh : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी उघडपणे भाजपवर निशाणा साधला आहे. अयोध्येत झालेला पराभव तसेच उत्तर प्रदेशातही भाजपला बसलेला फटका अनेकांच्या जिव्हारी लागला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट होणार आहे.

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये आरएसएसचे प्रशिक्षण शिबिर सुरू आहे. यादरम्यान दोघांची भेट होणार असल्याने चर्चेला उधाण आले आहे. दोघांमध्ये नेमकी कोणत्या मुद्यांवर चर्चा होणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

Yogi Adityanath, Mohan Bhagwat
Amit Shah Controversy : शाहांनी स्टेजवर खडसावलं? महिला नेत्यानं सांगितलं ‘त्या’ व्हिडिओचं सत्य

मोहन भागवत यांनी गुरूवारी काशी, गोरखपूर, कानपूर आणि अवध क्षेत्रातील संघाची जबाबदारी सांभाळात असलेल्या जवळपास 280 स्वयंसेवक कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संघाचा विस्तार, राजकीय स्थिती आणि सामाजिक मुद्यांवर चर्चा झाल्याचे समजते.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने आरएसएस नेत्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेशात पक्षाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. राज्यातील राजकीय स्थिती आणि संघ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Yogi Adityanath, Mohan Bhagwat
PM Narendra Modi Team : पंतप्रधानांचे चार ‘अनमोल रत्न’! मोदींची टीम लागली कामाला...

दरम्यान, आरएसएसचे नेते इंद्रेश कुमार यांनी सत्ताधारी भाजपविषयी उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपचा उल्लेख अहंकारी करत त्यांनी सडकून टीका केली. तसेच इंडिया आघाडीलाही त्यांनी राम विरोधी म्हटले आहे.

राम सगळ्यांसोबत न्याय करतात. रामाची भक्ती करणाऱ्यांमध्ये हळुहळु अहंकार आला. त्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष बनवले. पण लोकसभेच्या निवडणुकीत त्यांना त्यांचा पूर्ण हक्क मिळायला हवा होता, तो अंहकारामुळे मिळाला नाही. भगवान रामाने शक्ती रोखून धरली, असे विधान इंद्रेश कुमार यांनी केले आहे.  

दरम्यान, उत्तर प्रदेशात भाजपला 80 पैकी केवळ 33 जागांवर विजय मिळवता आला. तर समाजवादी पक्षाला ३७ जागा मिळाल्या आहेत. अयोध्येतही भाजपचा पराभव झाल्याने काँग्रेसकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करण्यात आली. निवडणुकीआधीच अयोध्येत राम मंदिराची उभारणी करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com