सोलापूर : उच्च शिक्षितांच्या रोजगारासंदर्भात दुर्लक्षित असलेल्या कर्नाटकच्या (Karnataka) बागलकोट विधानसभा मतदारसंघात काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व धर्मनिरपेक्ष जनता दल अशी तिहेरी चुरशीची लढत होत आहे. लिंगायत, रेड्डी, तेली व मुस्लिम मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघाची सारी मदार जातीवरच आहे. अभिनेता सुदीप याच्या सभेमुळे येथील तरुणाईला भाजपची भुरळ पडली आहे. (Bitter fight between BJP and Congress in Bagalkot)
गेल्या वेळी झालेल्या लढतीत चरंतीमठ यांनी १५ हजार ९३४ मतांनी मेटी यांचा पराभव केला आहे. मेटी यांनी २०१३ मध्ये येथून विजय मिळविला आहे. मेटी यांच्या रुपाने बागलकोटला मंत्रिमंडळात संधी मिळाली होती. त्यापूर्वी दोनवेळा चरंतीमठ यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून विजयश्री प्राप्त केली आहे. १९९८, १९९९, २००४ व २००८ या चार निवडणुकीत भाजपने या मतदारसंघावर वर्चस्व राखले आहे.
कृष्णा नदीला महापूर आला की आलमट्टी धरणातून पाणी सोडले जाते. त्यावेळी नेहमीच पाण्यात जावून एखाद्या बेटाप्रमाणे बागलकोटची स्थिती होत असते. या समस्येवर तोडगा निघाल्याने मतदारसंघातील रहिवासी सध्या खुशीत आहेत. महापुरावेळी पाण्यात राहणाऱ्या एक हजार ५८ मिळकतदारांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून त्यांना त्याचा भरपाई लवकरच मिळणार आहे. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही सुटला आहे. या एकाच प्रश्नावर गाजणाऱ्या निवडणुकीतील ‘दम' यंदा निघून गेला आहे. त्यामुळे प्रचारातून हा मुद्दाच बाजूला पडला आहे.
नेहमीच महापुराचे संकट येत असल्याने नव्या बागलकोटची निर्मिती झाली आहे. त्याचे स्वरुपही नेटके झाले आहे. परंतु नव्या वसाहतीमध्ये कापड, किराणा, भाजी मार्केटला मोठी जागाच नसल्याने व्यापाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीला येथे चांगली जागा मिळाली आहे. बागलकोट सिमेंट फॅक्टरी बंद झाल्याचाही परिणाम झाला आहे. जुन्या व नव्या शहरामुळे व्यापार प्रचंड खालावला आहे. केवळ शिक्षणासाठीच बागलकोटला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
रोजगाराचा प्रश्न मोठा
शैक्षणिक संकुलाचे प्रचंड जाळे असलेल्या बागलकोटमधून दरवर्षी हजारोंच्या संख्येने उच्च विद्याविभूषीत तरुण बाहेर पडत आहेत. त्यांच्या रोजगाराबाबत मात्र प्रचंड उदासिनता दिसून येते. येथील तरुण अन्य मोठ्या शहरांकडे स्थलांतरीत होत आहेत. सिमेंटची फॅक्टरी बंद पडल्याने स्थानिकांच्या रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
लक्ष्यवेध
- ६८.८२ टक्के साक्षर मतदार
- उच्च शिक्षणाच्या संस्थांचे मोठे जाळे
- काँग्रेसचे नाराज डॉ. देवराज पाटील जनता दलातून रिंगणात
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.