Rohit Pawar On Solapur Ncp : होय साहेब, सोलापूर राष्ट्रवादीतील भाकरी फिरवायची वेळ आली आहे : रोहित पवारांची पवारांकडे जाहीर मागणी

इथले काही पदाधिकारी आहेत, जे कडक कपडे घालतात. पुढं पुढं करतात आणि मग मीच सर्वोच्च आहे, असं दाखविण्याचा प्रयत्न करतात.
Rohit Pawar
Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

पंढरपूर : राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की, इथलीपण भाकरी फिरविण्याची वेळ आली आहे. होय साहेब, खऱ्या अर्थानं इथं भाकरी फिरवायची वेळ आली आहे. इथले काही पदाधिकारी आहेत, जे कडक कपडे घालतात. पुढं पुढं करतात आणि मग मीच सर्वोच्च आहे, असं दाखविण्याचा प्रयत्न करतात. पण इथली माणसं आपली आहेत, त्यांच्यासाठी भाकरी फिरविण्याची वेळ आज आल्याचं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी सोलापूर (Solapur) राष्ट्रवादीतील (NCP) सद्यस्थितीवर परखड भाष्य केले. (Ho Saheb, time has come to turn the bread in Solapur NCP : Rohit Pawar)

विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या बायो सीएनजी प्रकल्पाचे उद्‌घाटन ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर झालेल्या शेतकरी मेळाव्यात रोहित पवार बोलत होते. या वेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बबनराव शिंदे, रवींद्र धंगेकर, कैलास पाटील, संजय शिंदे, यशवंत माने, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे, बळीराम साठे, उमेश पाटील आदी उपस्थित होते

Rohit Pawar
Sangola Sugar Factory News : असा सुरू झाला सांगोला सहकारी साखर कारखाना : शरद पवारांनी संपूर्ण इतिहासच सांगितला

रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले की, आपले जिल्हाध्यक्ष बळीराम साठे अनेक वर्षांपासून कष्ट करत आहेत, पक्षासाठी परिश्रम घेत आहेत. अनेक वर्षांपासून त्यांनी आपल्या पार्टीला ताकद दिली आहे. अतिशय प्रामाणिकपणे ते आपले काम करत आहेत. पण, पवारसाहेब, मी इथं फिरल्यानंतर मला एक गोष्ट जाणवते. तुमच्यावर आणि पार्टीवर प्रेम करणारे अनेक लोक आहेत. त्यांच्यासाठी भाकरी फिरविण्याची वेळ आज आल्याचं मला वाटतं.

Rohit Pawar
Pawar On Pandharpur Ncp Candidate : अभिजित पाटील पंढरपूरचे २०२४ चे राष्ट्रवादीचे उमेदवार : शरद पवारांचे स्पष्ट संकेत

विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मला राज्यातील पाच ते सहा मतदारसंघाची जबाबदारी दिलेली आहे, त्यात पंढरपूर तालुक्याचा समावेश आहे. आगामी लोकसभेसंदर्भात महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या नेत्यांशी चर्चा व्हावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण, आमदारकीचा विचार करता २०२४ ला इथला आमदार आपल्याच विचाराचा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असे मी आपल्याला हक्काने सांगतो, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

Rohit Pawar
Abhijeet Patil Join NCP : 'विठ्ठल'चे अध्यक्ष अभिजित पाटील यांचा शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश

ते म्हणाले की, पंढरपूरच्या विकास आराखाड्यात लक्ष घालण्याची गरज आहे. लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय काही होऊ नये. त्याचबरेाबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा सुंदर असा एक वाडा आहे, त्याची एक वीटही हलली नाही पाहिजे, अशी आमची मागणी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com