Bjp President News : लोकसभेच्या निकालानंतर भाजपमध्ये मोठे फेरबदल; राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी महाराष्ट्रातील 'या' नेत्यांसह 'ही' नावे चर्चेत

Bjp Politics : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत 7 जूनला संपणार आहे. त्यामुळे लवकरच भाजपला (Bjp) नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे.
Jp Nadda, Chandrashekhar Bawankule
Jp Nadda, Chandrashekhar Bawankule Sarkarnama
Published on
Updated on

Election News : लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात पुन्हा एकदा भाजपचे सरकार येण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ नरेंद्र मोदी घेतील, अशी शक्यता आहे. निवडणूक निकालानंतर राष्ट्रीयस्तरावर भाजपमध्ये मोठे फेरबदलाचे संकेत मिळत आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची अध्यक्षपदाची मुदत 7 जूनला संपणार आहे. त्यामुळे लवकरच भाजपला (Bjp) नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच महाराष्ट्रात पुढील सहा महिन्यात विधानसभा निवडणूका होणार आहेत. त्यामुळे येत्या काळात राज्यातील प्रदेश कार्यकारिणीतही मोठे फेरबदल होणार आहेत. त्यासोबतच प्रदेशाध्यक्ष बदलण्याची शक्यता असून संघटनात्मकदृष्ट्या पक्षात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Bjp News)

Jp Nadda, Chandrashekhar Bawankule
Latur Lok Sabha Exit Poll 2024 : लातूर मतदारसंघात काँग्रेस व भाजपमध्ये कांटे की टक्कर !

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा ( J.P. Nadda) यांची अध्यक्षपदाची मुदत लवकरच संपत आहे. त्यानंतर भाजपच्या अध्यक्षपदासाठी आतापासूनच चाचपणी केली जात आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी राज्यातील नेते तथा राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या नावाची सध्या चर्चा जोरात सुरू आहे.

त्यासोबतच मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण, भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, वसुंधराराजे शिंदे यांची नावे सुद्धा समोर येत आहेत. त्यामुळे या पैकी एका नावावर येत्या काळात शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दलित चेहरा नवा राष्ट्रीय अध्यक्ष असू शकतो, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी विनोद तावडे यांनी भाजपचे महाराष्ट्र सरचिटणीस म्हणून काम पहिले आहे. त्यांनी 1995-1999 पर्यंत ते काम केले. पुन्हा 2002 मध्ये त्यांना ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. 2011 पर्यंत त्यांचा कार्यकाळ होता. 1999 मध्ये विनोद तावडे यांची भाजपच्या मुंबई महानगर युनिटच्या अध्यक्षपदी निवड झाली होती.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

त्यासोबतच 2014 साली राज्य मंत्रीमंडळात ते शालेय शिक्षण, क्रीडा मंत्री होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली नव्हती. 2020 नंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय राजकारणात संधी दिली होती. सध्या ते भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत.

प्रदेशाध्यक्षपदासाठी ओबीसी चेहरा चर्चेत

महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी नवा ओबीसी चेहरा चर्चेत आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड (Bhagvat Karad) यांचे नाव सध्या आघाडीवर असल्याचे समजते. मराठवाड्यातील कराड यांनी छत्रपती संभाजीनगरचे दोनवेळा महापौरपद भुषवले आहे. त्यानंतर मार्च 2020 पासून ते राज्यसभेचे खासदार आहेत. त्यानंतर केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपदही त्यांनी भूषवले असून आता नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे विश्वासू मानले जातात.

Jp Nadda, Chandrashekhar Bawankule
Bjp News : महायुतीवर तुटून पडणाऱ्या आव्हाडांच्या बंदोबस्तासाठी भाजप उतरणार रस्त्यावर; 'हे' मोठं प्लॅनिंग

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com