BJP AIADMK Alliance Tamil Nadu : मोठी बातमी! तामिळनाडूत आता BJP-AIADMK युती ; अमित शहांनी केली घोषणा अन् म्हणाले...

BJP and AIADMK Form Alliance Ahead of Tamil Nadu Elections : २०२६ची विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वात लढवणार हे देखील सांगितले आहे; जाणून घ्या, काय सांगितलं आहे?
Union Home Minister Amit Shah announces BJP-AIADMK alliance during his visit to Tamil Nadu
Union Home Minister Amit Shah announces BJP-AIADMK alliance during his visit to Tamil Nadusarkarnama
Published on
Updated on

Tamil Nadu Politics News : गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी चेन्नई येथे AIADMK सोबत युतीची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, २०२६मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक AIADMKचे प्रमुख ई पलानीस्वामी यांच्या नेतृत्वात लढवली जाईल. जागावाटप चर्चेनंतर निश्चित केले जाईल.

यावेळी अमित शहा म्हणाले की, युतीबाबत AIADMKची कोणतीही डिमांड किंवा मागणी नाही. पक्षाचे एनडीए आघाडीत सहभागी होणे दोघांसाठीही अतिशय फायदेशीर ठरणार आहे. आगामी निवडणूक द्रमुक(DMK) सरकारचे भ्रष्टाचार, दलितांवर, महिलांवर होणारे अत्याचार या मुद्य्यांना जनतेसमोर मांडून लढवली जाईल. जनता आता द्रमुकला घोटाळ्यांबाबत जाब विचारत आहेत आणि निवडणुकीतही याच मुद्य्यांवर मतदान होणार आहे.

Union Home Minister Amit Shah announces BJP-AIADMK alliance during his visit to Tamil Nadu
Nainar Nagendran BJP Tamil Nadu : ...म्हणून नैनार नागेंद्रनच असणार तामिळनाडू भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष; केवळ घोषणा बाकी!

सप्टेंबर २०२३मध्ये तत्कालीन तामिळनाडू प्रमुख अन्नामलाई यांच्याकडून केल्या गेलेल्या काही टिप्पण्यांमुळे AIADMK पक्ष NDA आघाडीमधून बाहेर पडला होता. तर आज BJP-AIADMK युतीची घोषणा केल्यानंतर पत्रकारपरिषदेत बोलताना अमित शहांनी सांगितले की, काही मुद्य्यांवर AIADMKची वेगवेगळी मतं आहेत. परंतु यावर आम्ही बसून चर्चा करू आणि गरज पडलीच चर कॉमन मिनिमम प्रोग्राम देखील असेल.

२०२१मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत DMKने राज्यातील एकूण २३४ जागांपैकी १३३ जागांवर विजय मिळवला होता. द्रमुक आघाडीने १५९ जागांवर विजय मिळवला होता. तर एनडीए आघाडी केवळ ७५ जिंकू शकली होती. AIADMKला ६६ जागा मिळाल्या होत्या तर भाजप अवघ्या चार जागांवर विजयी होता. याशिवाय आघाडीतील अन्य पक्षांच्या मिळून पाच जागा होत्या.

Union Home Minister Amit Shah announces BJP-AIADMK alliance during his visit to Tamil Nadu
Tahawwur Rana terror Plot : ''मुंबईच नाही तर देशभरातील अन्य शहरंही होती तहव्वूर राणाच्या टार्गेटवर'' ; 'NIA'चा मोठा दावा!

दरम्यान,भाजप नेते नैनार नागेंद्रन तामिळनाडू भाजपचे १३ वे अध्यक्ष बनणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे, याबाबत केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे. विशेष म्हणजे आधी ते AIADMK पक्षात होते. प्राप्त माहितीनुसार तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी त्यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला आहे. शिवाय, भाजप आणि AIADMKच्या युतीही झाली असल्याने आता त्यांचे भाजपचे नवीन प्रदेशाध्यक्ष होणे अतिशय महत्त्वाचे आहे. नागेंद्रन हे २०१७मध्ये भाजपमध्ये सहभागी झाले होते. अशीही माहिती समोर आली आहे की, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अन्नामलाई यांन नागेंद्रन यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com