Alpesh Thakor : भाजपचे अल्पेश ठाकोर यांनी राधनपूर मतदारसंघातून काँग्रेसच्या डॉ. हिमांशूभाई पटेल यांचा पराभव केला आहे. सध्या भाजपमध्ये असलेले हार्दिक पटेल यांच्या पाटीदार आरक्षण आंदोलनाविरोधात अल्पेश ठाकोर यांनी ओबीसी, एससी, एसटी एकता मंचची स्थापना करत सर्व समुदायांना लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणी केली होती.
पाटीदार आंदोलनाचा छुपा हेतू आरक्षण रद्द करण्याचा असल्याचा आरोपही त्यांनी केला. 2015 मध्ये ठाकोर मेहसाणात ओबीसी समुदायाची बैठक आयोजित केल्याबद्दल त्यांना अटक करण्यात झाली होती. 9 एप्रिल 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला.
कोळी समुदायातील प्रभावी नेते म्हणून अल्पेश ठाकोर ओळखले जातात. त्यांनी गुजरात क्षत्रिय ठाकोर सेना आणि ओबीसी, एससी, एसटी एकता मंचाची स्थापना केली होती. पाटीदार आंदोलनाच्या विरोधात त्यांनी एकता मंचाची स्थापना केली होती. काँग्रेसमधून भाजपत प्रवेश केल्यावर ज्या राधनपूर मतदारसंघातून अल्पेश ठाकोर यांचा पराभव झाला होता. तिथूनच पुन्हा विजय मिळवण्यात त्यांना यश आले आहे.
भाजप सध्या ९७ जागा पटकावलल्या आहेत, तर ५९ जागांवर भाजप पुढे आहेत. काँग्रेसने ७ जागांवर विजय मिळवला आहे, तर दहा जागांवर पुढे आहेत. समाजवादी पार्टी १, आपने 4 जागा जिंकल्या आहेत.
23 ऑक्टोबर 2017 मध्ये ठाकोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
राधनपूर मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली आणि विजयी झाले.
9 एप्रिल 2019 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून भाजपत प्रवेश केला.
राधनपूर मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा 3500 मतांनी पराभव झाला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.