Gujarat Election Result 2022 : नदीत उडी मारुन लोकांचा जीव वाचविणारे भाजपचे अमृतिया झाले सहाव्यांदा आमदार

Gujarat Election Result 2022 : कांतिलाल अमृतिया यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी टाकून अनेकांचे प्राण वाचवले होते.
kantilal amritiya
kantilal amritiyasarkarnama
Published on
Updated on

Gujarat Election Result 2022 : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत कांतिलाल अमृतिया हे उमेदवार चर्चेत होते. ते विजयी झाले आहेत. काही महिन्यापूर्वी मोरबी पूल कोसळल्याची दूर्घटना झाली होती. त्यावेळी अमृतिया यांनी नदीत उडी मारुन अनेकांना वाचवले होते. त्यांना भाजपनं तिकीट दिले होते.

मोरबी पूल घटनेवरुन काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. पण भाजपने अमृतिया यांना तिकीट देऊन आप आणि काँग्रेसचा डाव उधळून लावला आहे. कांतिलाल अमृतिया हे सहाव्यांदा आमदार झाले आहेत.

kantilal amritiya
Kurhani By Election Result 2022 : नितीश कुमार-तेजस्वी यादवांना भाजपचा धक्का ; गुप्ता विजयी

नदीत उडी मारुन अनेकांचा जीव वाचविण्याऱ्या अमृतिया हे मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. त्यांना ११,३,७०१ मते मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल पटेल यांनी ६१,५८० मतांनी पराभव केला आहे. तिसऱ्या स्थानावर आपचे उमेदवार पंकज रनसरिया हे आहेत.

आँक्टोबर महिन्यात झालेल्या या पूल अपघातात कांतिलाल अमृतिया यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी टाकून अनेकांचे प्राण वाचवले होते. त्यानंतर नोव्हेंबर झालेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार आणि राज्याचे मंत्री ब्रजेश मेरजा यांना तिकीट न देता भाजपने कांतिलाल यांना तिकीट दिले होते.

kantilal amritiya
Bharat Jodo Yatra : भारत जोडो यात्रेला गालबोट ; युवकाने स्वत:ला पेटवून घेतलं..

२०१७ मध्ये भाजपकडून कांतिलाल हे उमेदवार होते. काँग्रेसचे ब्रजेश मेरजा यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर मेरजा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com