गोडसे समर्थक महिलेने निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ होऊ दिला नाही!

तमिळनाडूमध्ये मंगळवारी निकाल लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाने चांगली कामगिरी केल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.
BJP Candidate Uma Anandhan
BJP Candidate Uma AnandhanSarkarnama
Published on
Updated on

चेन्नई : तमिळनाडूमध्ये (Tamil Nadu) मंगळवारी निकाल लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत (Local Body Elections) पक्षाने चांगली कामगिरी केल्याचा दावा भाजपकडून (BJP) केला जात आहे. चेन्नई (Chennai) महापालिकेच्या निवडणुकीतही भाजपने खातं उघडलं आहे. या निवडणुकीत भाजपला २०० पैकी एक जागा मिळाली आहे. विशेष म्हणजे ही एकमेव जागा महात्मा गांधीची (Mahatma Gandhi) हत्या करणाऱ्या नथूराम गोडसेच्या (Nathuram Godse) समर्थक असलेल्या उमेदवाराने जिंकली आहे.

उमा आनंदन (Uma Anandhan) असं चेन्नई महापालिकेत पाय ठेवणाऱ्या भाजपच्या एकमेव उमेदवाराचे नाव आहे. त्यांनी वॉर्ड क्रमांक १३४ मधून काँग्रेसच्या (Congress) उमेदवाराचा सुमारे दोन हजार मतांनी पराभव करत विजय मिळवला आहे. त्यामुळे सध्या त्या राज्यात चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यांच्या विजयामुळे भाजपचा चेन्नईत सुफडा साफ होता-होता वाचला. त्यामुळं भाजपसाठी त्यांचा विजय महत्वाचा मानला जात आहे. तसेच भाजपला चेन्नईत मिळालेले मतदानही आतापर्यंतचे सर्वाधिक असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे.

BJP Candidate Uma Anandhan
इम्रान खान यांचं खुलं आव्हान; थेट पंतप्रधान मोदींशी भिडायचंय…

आनंदन या नथूराम गोडसेच्या समर्थक आहेत. त्यांनी यापूर्वी दिलेल्या मुलाखतींमध्ये तसे संकेतही दिले आहेत. त्यांनी नथूराम गोडसेचं कौतूक करताना मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. एका यूट्यूब चॅनेलच्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, जात ही भारताची संस्कृती आहे आणि संस्कृतीशिवाय काहीच नाही. गांधींवर गोळी झाडणारा गोडसे हा हिंदू होता. त्यामुळेच त्याचा अभिमान आहे.

आपण गोडसे समर्थक असल्याचे त्या उघडपणे सांगतात. विजयी झाल्यानंतर मात्र त्यांनी आपल्या वादग्रस्त विधानांवर बोलण्यास नकार दिला. आपल्या भागात पुरग्रस्त नागरिकांसाठी काम करण्यास असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून वॉर्डाचा चेहरामोहरा बदलणार असल्याचेही त्या म्हणाल्या. दरम्यान, मतमोजणीआधी आनंदन यांना केवळ आठ मतं मिळतील असे मीम्स सोशल मीडियात व्हायरल झाले होते. पण प्रत्यक्षात त्यांना पाच हजारांहून अधिक मतं मिळाली आहेत.

दरम्यान, तमिळनाडूनतील सर्व २१ महापालिकांवर डीएमकेने कब्जा केला आहे. तसेच १३८ नगरपालिका आणि ४९० नगरपंयातींपैकी अनेक ठिकाणी डीएमकेचाच डंका आहे. पक्षाने जवळपास १२ हजार ८०० जागांवर विजय मिळवला आहे. महापालिकेत ९४६, नगरपालिकांमध्ये २ हजार ३६० आणि नगर पंचायतींमध्ये ४ हजार ३८८ जागा मिळाल्या आहेत. तर स्वतंत्रपणे निवडणूक लढणाऱ्या भाजपला महापालिकांमध्ये २२, नगरपालिकांमध्ये ५६ आणि नगर पंचायतींमध्ये २३० जागा मिळवता आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com