धक्कादायक : नड्डांच्या ट्विटर अकाऊंटवरून थेट रशियाच्या मदतीसाठी मागितला निधी!

क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रशियाला मदतीचे आवाहन यात करण्यात आले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.
j. p. nadda
j. p. nadda Sarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : रशियाने युक्रेनविरोधात युध्द (Russia-Ukraine War) पुकारल्यानंतर भारतासह सर्वच देशांनी त्याचा निषेध केला आहे. पण रविवारी सकाळी भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या ट्विटर अकाऊंटवरून थेट रशियासाठी (Russia) निधी मागणी करणारे ट्विट करण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून रशियाला मदतीचे आवाहन यात करण्यात आले होते.

हॅकर्सनी नड्डा यांचे ट्विटर अकाऊंट हॅक करून हे आवाहन केल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात हॅकर्सनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे ट्विटर अकाऊंट हॅक केले होते. भारताने (India) अधिकृतपणे बिटकॉईनला (Bitcoin) कायदेशीर मान्यता दिल्याची घोषणा त्यात करण्यात आली. त्यानंतर रविवारी (ता. २७) सकाळी हॅकर्सनी नड्डा यांचे अकाऊंट हॅक केले.

j. p. nadda
पळण्यासाठी मदत नको, लढण्यासाठी शस्त्रास्त्रे द्या- झेलेन्स्कींनी धुडकावली अमेरिकेची ऑफर

हॅकर्सनी सुरूवातीला युक्रेनसाठी मदत मागितली होती. क्रिप्टोकरन्सी स्वीकारली जात असल्याचे त्यामध्ये म्हटले होते. त्यानंतरच्या ट्विटमध्ये इंग्रजीत रशियाच्या लोकांसोबत असल्याचे सांगत पुन्हा क्रिप्टोकरन्सीचा उल्लेख करण्यात आला. तर हिंदी मेसेजमध्ये युक्रेनसोबत असल्याचे म्हटले होते. तिसऱ्या ट्विटमध्ये हॅकर्सनी अकाऊंट हॅक झाल्याचे स्पष्ट केले.

Screenshot of the hacked tweets
Screenshot of the hacked tweets

‘सॉरी माझे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. रशियाला मदतीसाठी, कारण त्यांना मदतीची गरज आहे’, असं तिसरं ट्विट होतं. दरम्यान, आता ही सर्व ट्विट डिलिट करण्यात आली आहेत. भाजपच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नड्डा यांचे अकाऊंट काही कालावधीपुरते हॅक झाले होते. आता ते नियंत्रणात आहे. ट्विटशी बोलणे सुरू असून शोध घेतला जात आहे.’

Screenshot of the hacked tweets.
Screenshot of the hacked tweets.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अकाऊंट २६ डिसेंबर रोजी हॅक झाले होते. भारताने अधिकृतपणे बिटकॉईनला कायदेशीर मान्यता दिल्याची घोषणा त्यात करण्यात आली. सरकारने 500 बिटकॉईन खरेदी केली असून ते देशातील नागरिकांना वाटली जाणार आहेत, असंही या ट्विटमध्ये म्हटलं होतं. रविवारी पहाटे 2 वाजून 11 मिनिटांनी हे ट्विट करण्यात आलं होतं. सप्टेंबर २०२० मध्येही मोदींच्या संकेतस्थळाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले होते. त्यावेळी क्रिप्टोकरन्सीबाबत हे ट्विट होतं. तसेच नागरिकांना कोविडसाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये दान करण्याचे आवाहनही करण्यात आले होते. त्यानंतर काही मिनिटांतच हे अकाऊंट हॅक जॉन विक नावाच्या व्यक्तीने हॅक केल्याचे ट्विट त्यावरच करण्यात आले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com