

Dhirendra Shastri Bengal controversy : पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी कोलकत्याच्या कालीघाट मंदिरामध्ये जाऊन मासे खाल्ले.
भाजप कायमच पश्चिम बंगालच्या परंपरांच्या बाजूने उभा राहिला आहे, असे सांगत भाजपच्या नेत्यांनी मांसाहारावरून निर्माण झालेला वाद थांबविण्याचे आवाहन केले आहे.
नवरात्र काळात मांसाहार करण्यावरून बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी बंगाली हिंदूंवर (Hindu) टिका केली होती. दुर्गापूजेच्या काळात मांसाहार करणारे पाखंडी आहेत, असे त्यांनी म्हटले होते.
नवरात्रामध्ये मांसाहार पश्चिम बंगालच्या (West Bengal) परंपरेचा भाग असून, धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर, अधिकारी कौशिकी अमावस्येला कालिघाट मंदिरात गेले. त्यावेळी त्यांनी तेथे बसून मासे आणि भात असा प्रसाद खाल्ल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत.
कालीघाट मंदिरामध्ये कालीमातेला मासे आणि बकऱ्याचा नैवेद्य वाहण्यात येतो आणि नैवेद्य दाखविल्यानंतर भाविक त्याचे सेवेन करतात. मात्र, भाजपच्या उत्तर भारतातील नेत्यांकडून कायम शाकाहारासाठी आग्रह करण्यात येतो आणि त्यावरून वाद निर्माण होतात.
यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी म्हटले आहे, की ‘आता हा वाद थांबायला हवा. पश्चिम बंगालची श्रद्धा, परंपरा आणि जीनवशैली यांचा आदर करत मुख्यमंत्र्यांनी कालिघाट येथे माश्यांचा प्रसाद खाल्ला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पश्चिम बंगालचे हित, परंपरा यांसाठी कायम उभा राहील.’
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.