Narendra Modi : भाजपने हरियाणा, महाराष्ट्रानंतर दिल्लीत इतिहास रचला; पीएम मोदींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

BJP creates history in Delhi News : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला.
Narendra Modi
Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : विधानसभा निवडणुकीत दिल्लीकरांनी आम्हाला मोठा आशीर्वाद दिला आहे. विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडून दिले आहे. त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास, प्रेम हे आमच्यावरील कर्ज आहे. हा मिळवलेला विजय हा ऐतिहासिक आहे. दिल्लीतील नागरिकांनी दहा वर्षाच्या भ्रष्ट कारभारातून सुटका करून घेतली आहे. या निवडणुकीत दिल्लीतील जनतेने स्पष्ट जनादेश दिला आहे. भाजपने हरियाणा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला, महाराष्ट्रात रेकॉर्डब्रेक विजय तर दिल्लीत इतिहास रचला असल्याचे प्रतिपादन पीएम नरेंद्र मोदी यांनी केले.

दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयानंतर भाजपकडून मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी पीएम मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीतील नागरिकांनी विकास, व्हिजन आणि विश्वासाला मत दिले आहे. या विजयबद्दल त्यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Narendra Modi
Delhi AAP news : 'शीश महाल', 'मद्य प्रकरणा'मुळे 'आप'ची साफसफाई

दिल्लीच्या जनादेशाने स्पष्ट केले आहे की, येत्या काळात कोणाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहायचा याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील जनतेने कधीच मला निराश केले नाही. आततापर्यतच्या लोकसभेच्या तीन निवडणुकीत ते माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिली आहेत. लोकसभेच्या तीन निवडणुकीत भाजपला (Bjp) मोठे यश मिळाले. त्यामुळे येथील जनतेला कधीच निराश करणार नसल्याचे पीएम मोदी यांनी स्पष्ट केले.

Narendra Modi
BJP Vs Shivsena : शिंदेसेनेच्या 'या' मंत्र्यानं फडणवीसांविरोधात थोपाटले दंड; म्हणाले, 'अंतिम निर्णय माझाच...'

आपल्या छोट्याछोट्या मुद्द्यावर ज्या पक्षांचा जीव आहे, त्यांच्यावर आता काँग्रेसची नजर आहे. परंतु आता त्यांनाही लक्षात आलं असेल, ते बोलून दाखवत नसतील. परंतु समजले असतील की काँग्रेस त्यांनाच खात आहे. इंडी आघाडीतील पक्ष आता काँग्रेसची ही खेळी समजू लागले आहेत. इंडी आघाडीतील पक्षाना याची जाणीव झाली आहे की, जी व्होट बँक त्यांनी काँग्रेसकडून हिसकावली होती, आता काँग्रेस ती परत मिळवण्याच्या प्रयत्नात लागली आहे, असं मोदींनी यावेळी सांगितलं.

Narendra Modi
Delhi AAP news : 'शीश महाल', 'मद्य प्रकरणा'मुळे 'आप'ची साफसफाई

दिल्लीत आपण बघितले की इंडी आघाडीच्याच पक्षांनी एकजूट होवून काँग्रेसला त्यांची पात्रता दाखण्याचा प्रयत्न केला. आपली व्होट बँक रोखण्याचा प्रयत्न केला. इंडी आघाडी पूर्णपणे आधीपासूनच काँग्रेसच्या विरोधात मैदानात उतरली होती. तरीही काय हालं झाले बघा दोन्हीकडे. ते काँग्रेसला अडवण्यात तर यशस्वी ठरले, परंतु आपदाला वाचवण्यात त्यांना यश आलं नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला त्यांच्या दारूण पराभवार जोरदार टोले लगावले.

Narendra Modi
Anna Hajare News : संजय राऊत अन् आव्हाडांनंतर आता महाविकास आघाडीचा 'हा' नेताही अण्णा हजारेंवर भडकला!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com