Anna Hajare News : संजय राऊत अन् आव्हाडांनंतर आता महाविकास आघाडीचा 'हा' नेताही अण्णा हजारेंवर भडकला!

Many Scams By The BJP Government : विविध प्रश्नांनी राज्यातील तसेच केंद्रातील शेतकरी हवालदिल आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मणिपूरसह महाराष्ट्रात (Maharashtra) महिलांवरती अत्याचार सुरू आहेत. अशावेळी लोकांची अपेक्षा होती की अण्णांनी आंदोलन करावे.
Anna Hazare
Anna Hazaresarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे. काँग्रेस सरकारच्या काळात 2014 पूर्वी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना आपण अनेकदा आंदोलन करताना बघितले आहे. या काळात छोटं टूक वाजले तरी अण्णा आंदोलन करायचे, मात्र भाजप सरकारच्या दहा वर्षाच्या काळात त्यांचा एकही शब्द आपण ऐकला नाही, अशा शब्दात रोहित पवार यांनी अण्णांच्या भुमिकेवर शंका व्यक्त केली आहे.

केंद्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर गेल्या दहा वर्षांमध्ये इलेक्ट्रॉल बॉण्डचा घोटाळा, ॲम्बुलन्स घोटाळा झाला. विविध प्रश्नांनी राज्यातील तसेच केंद्रातील शेतकरी हवालदिल आहेत. बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. मणिपूरसह महाराष्ट्रात (Maharashtra) महिलांवरती अत्याचार सुरू आहेत. अशावेळी लोकांची अपेक्षा होती की अण्णांनी आंदोलन करावे. पण गेल्या दहा वर्षात त्यांचा एकही शब्द कानावर पडला नाही. लोकांना अण्णांकडून मोठ्या अपेक्षा असतानाही ते शांत का?, असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anna Hazare
SDRF boat capsizes in Pravara River : पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचा ताफा संतप्त ग्रामस्थांनी अडवला...

अण्णा हजारे नवीन काळातील गांधी समजतात आणि दुसरीकडे भाजपच्या (BJP) कार्यकाळात सोयीचे आंदोलन करत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. भाजप सरकारच्या काळात त्यांनी एक प्रकारे मुखवटा घातलाय, असेच आपल्याला म्हणावे लागेल, असेही पवार म्हणाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना अण्णा हजारे म्हणाले होते की, 12 वर्षांनंतर जाग कशी आली? माझ्या आंदोलनांमुळे यांचे मंत्री घरी गेल्याचा त्यांना राग असावा. त्यावर आता रोहित पवारांनी अण्णांना खडे बोल सुनावत जाब विचारला आहे.

शरदचंद्र पवार पक्षाचे नगरचे उमेदवार आमदार निलेश लंके यांनी ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्टाँगरूमच्या सीसीटीव्ही कॅमेराच्या छेडछाडीच्या व्हिडीओवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, स्टाँगरूमला इतकी मोठी सुरक्षा यंत्रणा असतांना तिथे एखादी व्यक्ती जातेच कशी? सुप्रिया सुळे यांच्या निवडणुकीचे ईव्हीएम ज्या ठिकाणी ठेवले होते तेथील सीसीटीव्ही बंद झाले होते. शिरूरमध्ये देखील तसाच प्रकार झाला. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाकडून हलगर्जीपणा होत असेल तर त्यांच्या कार्यपद्धतीबाबत शंका येणे स्वाभाविकच आहे.

Anna Hazare
Nashik Constituency 2024 : निलेश लंके प्रकरणाने नाशिकची शिवसेना सावध, स्ट्राँगरूम विषयी केली 'ही' सूचना !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com