T Raja Singh : भाजपला मोठा झटका; आक्रमक नेते टी राजा यांचा राजीनामा, अध्यक्ष निवडीवरून उचललं टोकाचं पाऊल

T Raja Singh’s Resignation: A Political Jolt to BJP : तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहे. तेलंगणासह महाराष्ट्रातही त्यांच्या तडाखेबंद भाषणांनी वाद निर्माण झाला होता.
T. Raja Singh submits resignation from BJP following disagreement over leadership choices, sparking political tension in Telangana.
T. Raja Singh submits resignation from BJP following disagreement over leadership choices, sparking political tension in Telangana. Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यांमध्ये शुक्रवारी भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली. या निवडीनंतर पुढील काही दिवसांत राष्ट्रीय अध्यक्षांची निवडणूक होणार आहे. राज्यांतील निवडींवरून पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे आक्रमक नेते टी. राजा सिंह यांनी थेट पक्षाला रामराम ठोकला आहे.

तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह हे हिंदुत्वाचे कट्टर समर्थक आहे. तेलंगणासह महाराष्ट्रातही त्यांच्या तडाखेबंद भाषणांनी वाद निर्माण झाला होता. तेलंगणामध्येही आज भाजपच्या प्रदेशाध्यक्षांची निवड झाल्याचे समजते. याच निवडीवरून उघडपणे नाराजी व्यक्त करत टी. राजा यांनी थेट पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने खळबळ उडाली आहे.

टी राजा सिंह हे तेलंगणातील भाजपचे बडे नेते मानले जात होते. त्यांनी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांच्याकडे राजीनामा पाठवला. मुस्लिमांविषयीची त्यांची विधाने अनेकदा वादात सापडली होती. त्यांनी सोशल मीडियात एक पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट केली. हिंदुत्व आणि गोशामहलमधील लोकांच्या सेवेसाठी कटिबध्द आहे.

T. Raja Singh submits resignation from BJP following disagreement over leadership choices, sparking political tension in Telangana.
Narendra Bhondekar : मला मंत्री का केले नाही? एकनाथ शिंदेंसमोरच चढला होता आमदार भोंडेकरांचा पारा...

तेलंगणाच्या प्रदेशाध्यक्षपदी रामचंदर राव यांची निवड निश्चित मानली जात आहे. या शर्यतीत केवळ त्यांचा अर्ज आला आहे. त्यामुळेच नाराज झाल्याने टी. राजा यांनी राजीनामा दिला आहे. तसा उल्लेखही त्यांनी पत्रात केला आहे. भाजपने यापूर्वी त्यांना पक्षातून काही काळासाठी निलंबितही केले होते.

T. Raja Singh submits resignation from BJP following disagreement over leadership choices, sparking political tension in Telangana.
Dowry Torture Case : हगवणेंपेक्षा धक्कादायक! 80 तोळे सोने, 70 लाखांची व्हॉल्वो कार देऊनही छळ, अखेर नवविवाहितेची आत्महत्या

2022 मध्ये टी राजा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून वाद निर्माण झाल्याने राज्य सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली होती. याच वादानंतर भाजपने त्यांना निलंबित केले होते. पण काही महिन्यांत त्यांचे निलंबन रद्द करण्यात आले. मात्र, त्यानंतर त्यांच्याकडून अशी विधाने करण्यात आले. हिंदुत्व आणि गोरक्षा आदी मुद्द्यांवर ते आक्रमकपणे भाषण करतात. महाराष्ट्रतही त्यांच्या विधानांमुळे वाद निर्माण झाला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com