भाजपनं इतिहास रचला; योगी मोडणार 37 वर्षांची परंपरा

उत्तर प्रदेशात भाजपने (BJP) 202 ची मॅजिक फिगर पार केल्याचे सुरूवातीच्या कलांनुसार दिसत आहे.
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi | UP Election Results 2022 Live Updates | Yogi Adityanath News
Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi | UP Election Results 2022 Live Updates | Yogi Adityanath NewsSarkarnama

लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपने (BJP) 202 ची मॅजिक फिगर पार केल्याचे सुरूवातीच्या कलांनुसार दिसत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानुसार राज्यात सकाळी अकरा वाजेपर्यंत भाजपचे 241 उमेदवार आघाडीवर आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. या राज्यात मागील 37 वर्षात कोणत्याही पक्षाला सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळालेली नाही. ही परंपरा मोडित निघणार असून योगी आदित्यनाथ सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. (UP Election 2022 Result)

निवडणूक आयोगानुसार, सकाळी अकरा वाजेपर्यंत एकूण 403 मतदारसंघांपैकी 379 मतदारसंघातील कल समोर आले आहेत. त्यामध्ये 241 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर प्रमुख विरोधक असलेल्या समाजवादी पक्षाला (Samajwadi Party) केवळ 103 जागा मिळाल्या आहेत. पण या निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या जागांमध्ये जवळपास दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. तर भाजपच्या काही जागाही कमी होऊ शकतात, असं दिसते. (UP Election Results 2022 Live Updates)

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi | UP Election Results 2022 Live Updates | Yogi Adityanath News
राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर; शिवसेना तळात

बहुजन समाज पक्ष व काँग्रेसचे उमेदवार प्रत्येकी चार जागांवर आघाडीवर आहेत. समाजवादी पक्षाचे प्रमुख मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय लोकदलाच्या केवळ सात उमेदवारांना सात जागा मिळाल्या आहेत. आतापर्यंत भाजपला जवळपास 42 टक्के मतं मिळाली आहेत. समाजवादी पक्ष 31 टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आहे. बसपाला जवळपास 13 टक्के तर काँग्रेसला केवळ अडीच टक्के मतं मिळाली आहेत.

राष्ट्रवादी, शिवसेनेचे उमेदवार पिछाडीवर

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही उमेदवार उतरवले होते. राष्ट्रवादी काँग्रेसने अनुपशहर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते के. के. शर्मा यांना उतरवलं आहे. पण सुरूवातीच्या कलांमध्ये शर्मा हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या मतदारसंघात भाजपने आघाडी घेतली आहे. शिवसेनेने या मतदारसंघात उमेदवार उतरवला होता. मतदारसंघातील एकूण 11 उमेदवारांत शिवसेना तळाला आहे.

Amit Shah, Yogi Adityanath and Narendra Modi | UP Election Results 2022 Live Updates | Yogi Adityanath News
Punjab Election Results : आपच्या झाडूने काँग्रेसचा सुपडा साफ; सिद्धू, कॅप्टन अमरिंदर सिंग पराभवाच्या छायेत

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. पण संपूर्ण देशाला उत्तर प्रदेशच्या निकालाची उत्सुकता लागून राहिली आहे. राज्यात एकूण 403 जागांसाठी निवडणूक झाली आहे. राज्यात राष्ट्रवादीचा एकमेव उमेदवार आहे. तर शिवसेनेचे 37 उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेचा एकही उमेदवार आघाडीवर नसल्याचे सुरूवातीच्या कलांमध्ये दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील सकाळी दहा वाजेपर्यंतच्या माहितीनुसार अनुपशहर मतदारसंघात राष्ट्रवादीचे शर्मा यांना 1122 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेच्या उमेदवार रेश्मा यांना केवळ तीन मतं मिळाली आहेत. विशेष म्हणजे नोटाला 25 मतं मिळाली आहेत. अनुपशहरमध्ये भाजपचे संजय कुमार शर्मा 3 हजार 574 मतांसह आघाडीवर आहेत.

मागील निवडणुकीतील स्थिती -

भाजप - 312 (अपना दल 9, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी 4) - 325

समाजवादी पक्ष - 47

बसपा - 19

काँग्रेस - 7

राष्ट्रीय लोकदल - 1

इतर - 4

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com