Pawan Singh News : भाजपने दिलेली उमेदवारी नाकारली अन् अपक्ष अर्ज भरला! पवन सिंह यांची हकालपट्टी

Lok Sabha Election 2024 : पवन सिंह यांना बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. पण त्यांनी निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत भाजपला धक्का दिला होता.
Pawan Singh
Pawan SinghSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या उमेदवारी यादीत प्रसिध्द भोजपुरी गायक पवन सिंह (Pawan Singh News) यांचे नाव होते. त्यांना पश्चिम बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली होती. पण जाहीर झालेले तिकीट त्याचवेळी नाकारत आता ते अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. भाजपसाठी (BJP Politics) हा मोठा धक्का मानला जात आहे. पवन सिंह यांना एनडीएच्या उमेदवाराविरोधात केलेली बंडखोरी भोवली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

पवन सिंह हे बिहार भाजप प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य होते. बिहारसह (Bihar) उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये भोजपुरी गायक म्हणून ते प्रसिध्द आहेत. त्यामुळे भाजपने त्यांना बंगालमधील आसनसोल मतदारसंघातून अभिनेते शत्रुघ्न सिन्हा (Shatrughna Sinha) यांच्या विरोधात उमदवारी जाहीर केली होती. पवन सिंह यांनी दुसऱ्याच दिवशी उमेदवारी नाकारली. (Latest Political News)

Pawan Singh
Devendra Fadnavis News : ठाकरेंनंतर आता केजरीवालांची बारी! देवेंद्र फडणवीसांची तोफ दिल्लीत धडाडणार

निवडणूक लढणार नसल्याचे जाहीर करत पवन सिंह यांनी भाजपला धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (JP Nadda) यांचीही भेट घेतली होती. पण अखेर ते भाजपला झटका देत अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्याआधी ते राष्ट्रीय जनता दलाकडून (RJD) उमेदवार असतील, अशीही चर्चा होती. (Lok Sabha Election 2024)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पवन सिंह यांनी बिहारममधील कराकट मतदारसंघ निवडला आहे. या मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोक मोर्चाचे प्रमुख उपेंद्र कुशावाहा (Upendra Kushwaha) एनडीएचे उमेदवार आहेत. याच मतदारसंघातून पवन सिंह यांच्या आईनेही उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. या मतदारसंघाची निवडणूक अखेरच्या टप्प्यात म्हणजे एक जूनला आहे.

भाजपने पवन सिंह यांच्या या भूमिकेनंतर पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आज त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पवन सिंह यांच्या उमेदवारीचा फटका भाजपच्या इतर उमेदवारांनाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच माजी केंद्रीय मंत्री व आराह मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आर. के. सिंह यांनीही पवन सिंह यांच्या हकालपट्टीची मागणी केली होती.

Pawan Singh
Rahul Gandhi News : राहुल गांधींना 'त्या' प्रकरणात झारखंडमधील न्यायालयाने बजावले समन्स!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com