Nitin Gadkari Threat Case: गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट; चौकशीत धक्कादायक खुलासे, केंद्रीय तपास यंत्रणेकडे..

Nitin Gadkari News: १ एप्रिल रोजी दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती.
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

Nagpur News: गेल्या काही दिवसामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांनी दोन वेळा धमकीचे फोन आले. नागपूर येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात धमकीचे हे फोन आले आहेत. १ एप्रिल रोजी दहा कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.

गडकरी धमकी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडे हे प्रकरण सोपविण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तवाहिनीही ही बातमी दिली आहे. जयेश पुजारी याने ही धमकी दिल्याचा आरोप आहे. कर्नाटकच्या कारागृहात असताना त्याने गडकरींच्या कार्यालयात धमकीचा फोन केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

Nitin Gadkari
AAP News : काँग्रेसच्या बालेकिल्याला AAP ने पाडले खिंडार ; माजी आमदाराला 'आप' कडून तिकीट

यापूर्वी देखील एकदा नितीन गडकरी यांना त्याच्याच नावाने धमकीचा फोन आला होता. सध्या जयेश पुजारी उर्फ कांथा हा नागपूरच्या धंतोली पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरू आहे. त्याच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. त्यामुळे हे प्रकरण लवकरच केंद्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात येणार असल्याचे समजते.

Nitin Gadkari
BJP News : काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांचा मुलगा भाजपमध्ये

जयेश पुजारी यांची नागपूर पोलीस कसून चौकशी करीत आहेत, चौकशीत हे प्रकरण गंभीर असल्याचे तपासात पोलिसांना आढळले आहे. नितीन गडकरी यांना धमकीचा फोन आल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

'डॉन व्हायचं,' म्हणून जयेश पुजारीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकीचा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. डॉन बनण्यासाठी आपण नितीन गडकरी यांना धमकी दिल्याचा खुलासा जयेश पुजारी याने नागपूर पोलिसांसमोर केला आहे. ‘प्रोडक्शन वॉरन्ट’वर जयेश पुजारीला नागपुरात आणण्यात आलं आहे.(Latest Vidarbha News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com