Karnataka Assembly Elections Result 2023 Live : भाजपने पराभव केला मान्य; मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले...

Karnataka Assembly Elections Result : कर्नाटकमध्ये काँग्रेसचा ऐतिहासिक विजय
Basavaraj Bommai
Basavaraj BommaiSarkarnama

Karnataka Assembly Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने आता मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस ऐतिहासीक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेस 139 जागांच्या जवळपास पोहचली आहे. तर भाजप (BJP) 62 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस (JDS) 20 जगांवर आघाडीवर आहे.

त्याचवेळी भाजप नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनीही पराभव स्वीकारला आहे. पराभव मान्य करत कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, "सर्व निकाल आल्यानंतर, आम्ही तपशीलवार विश्लेषण करू आणि एक राष्ट्रीय पक्ष म्हणून, आम्ही विविध स्तरांवर आमच्या उणिवा पाहू, त्या दुरुस्त करू आणि त्याची पुनर्रचना करू आणि लोकसभा निवडणुकीत परत विजय मिळवू, असा विश्वास बोम्मई यांनी व्यक्त केला.

Basavaraj Bommai
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : 50 जागांच्या निकालाकडे लक्ष; भाजपला अजूनही आशा

आतापर्यंत झालेल्या मत मोजणीमध्ये काँग्रेसला (Congress) 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक मोठा विजय कर्नाटकमध्ये दिसत आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसताना दिसत आहे. 2018 च्या निवडणुकीमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपला 104 जागा तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.

दरम्यान, कर्नाटमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. हे ऐतिहासीक बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा होता. दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपचे सरकार होते, ते सरकारही गेल्यामुळे भाजपसाठी हो धोक्याची घंटा मानली जात आहे. कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता.

Basavaraj Bommai
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

भाजपने अनेक राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार तळ ठोकून होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रचार केला होता. त्याच प्रमाणे काँग्रेसने ही जोरदार प्रचार केला होता. काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी प्रचाराची धुरा सांबाळली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com