Karnataka Assembly Elections Result 2023 Live : कर्नाटकमध्ये काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; भाजपने गमावले दक्षिणेतील एकमेव राज्य...

Karnataka Assembly Elections Result : काँग्रेसची 130 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहे.
Narendra Modi, Rahul Gandhi News
Narendra Modi, Rahul Gandhi NewsSarkarnama
Published on
Updated on

Karnataka Assembly Elections Result : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काँग्रेसने आता मोठी आघाडी घेतली आहे. काँग्रेस ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांमध्ये काँग्रेस 132 जागांच्या जवळपास पोहचली आहे. तर भाजप (BJP) 63 जागांवर आघाडीवर आहे. तर जेडीएस (JDS) 21 जगांवर आघाडीवर आहे.

आतापर्यंत झालेल्या मत मोजणीमध्ये काँग्रेसला (Congress) 43.2 टक्के, भाजपला 36 टक्के आणि जेडीएसला 13 टक्के मते मिळत आहेत. त्यामुळे काँग्रेसचा एक मोठा विजय कर्नाटकमध्ये दिसत आहे. भाजपला या निवडणुकीत मोठा धक्का बसताना दिसत आहे. 2018 च्या निवडणुकीमध्ये त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. भाजपला 104 जागा तर काँग्रेसला 80 जागा मिळाल्या होत्या. तर जेडीएसला 37 जागा मिळाल्या होत्या.

Narendra Modi, Rahul Gandhi News
Karnataka Assembly Elections Result 2023 Live : 50 जागांच्या निकालाकडे लक्ष; भाजपला अजूनही आशा

2013 च्या निवडणुकीमध्येही काँग्रेसला १२२ जागांवर विजय मिळला होता. भाजपला त्यावेळी केवळ 40 जागा मिळाल्या होत्या. आणि जेडीएसला देखील 40 जागा मिळाल्या होत्या. तर, इतरांना 22 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेस एकहाती सत्तेत आली होती. तर 2008 च्या निवडणुकीमध्ये भाजप कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून सत्तेवर आला होता. येडियुरप्पा मुख्यमंत्री झाले होते. भाजपला 110 जागा मिळाल्या होत्या. अपक्षांच्या मतीने सरकार बनवले होते. 2004 मध्येही कर्नाटकात कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्रिशंकु परिस्थिती निर्माण झाली होती.

मात्र, यावेळी कर्नाटमध्ये काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत आहे. हे ऐतिहासिक बहुमत आहे. त्यामुळे काँग्रेससाठी कर्नाटकातील विजय अतिशय महत्त्वाचा आहे. दक्षिणेतील एकमेव राज्यात भाजपचे सरकार होते, ते सरकारही गेल्यामुळे भाजपसाठी हो धोक्याची घंटा मानली जात आहे. कर्नाटकमध्ये भाजपने जोरदार प्रचार केला होता.

Narendra Modi, Rahul Gandhi News
Karnataka Election Result : निपाणीमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे उत्तमराव पाटील आघाडीवर

त्यामध्ये अनेक राज्याचे मुख्यमंत्री, खासदार, आमदार तळ ठोकून होते. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी जोरदार प्रचार केला होता. त्याच प्रमाणे काँग्रेसनेही जोरदार प्रचार केला होता. काँग्रेसकडून राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रचाराची धुरा सांबाळली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com