Madhya Pradesh Politics : भाजपने घेतली आघाडी; मध्य प्रदेश निवडणुकीसाठी पहिली उमेदवारी यादी जाहीर

First candidate list of BJP : आपली परंपरा मोडत पक्षाने गुरुवारी ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली.
BJP News
BJP NewsSarkarnama

Madhya Pradesh News : मध्य प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. आपली परंपरा मोडत पक्षाने गुरुवारी ३९ उमेदवारांची नावे जाहीर केली. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उमेदवारांची यादी फायन केली आहे. त्यामुळे मध्य प्रदेशची (Madhya Pradesh) विधानसभा निवडणुकही लवकरच जाहीर होण्याची शक्याता वर्तवली जात आहे. निवडणूक जाहीर होण्याची वाट न बघता भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आघाडी घेतली आहे.

भाजपने उमेदवार जाहीर केलेल्या जागांपैकी बहुतांश जागा अशा आहेत ज्या ठिकाणी सध्या काँग्रेसचे (Congress) आमदार आहेत. भाजपने जाहीर केलेल्या या यादीमध्ये ग्वाल्हेर चंबळ प्रदेशातील 34 पैकी सहा जागांचा समावेश आहे. पक्षाने मागील निवडणुकीत पराभूत झालेल्या बहुतांश उमेदवारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.

BJP News
Ahmednagar Politics : शिर्डीची जागा सुटणार कुणाला ? भाऊसाहेब वाकचौरे पेचात !

गोहड राखीव जागेवरून रणवीर जाटव यांचे तिकीट कापून भाजपने (BJP) लाल सिंह आर्य यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली. 2018 मध्ये काँग्रेसचे रणवीर जाटव, आर्य यांना पराभूत करून येथून विजयी झाले. मात्र, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाली तेव्हा आमदार पदाचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये रणवीर जाटव यांचाही समावेश होता.

पोटनिवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना पराभव पत्करावा लागला होता. असे असतानाही सरकारने त्यांना हस्तकला विकास महामंडळाचे अध्यक्ष करून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा दिला, मात्र आता त्यांचे तिकीट कापले गेले आहे.

BJP News
Ajit Pawar News : अजितदादा म्हणाले, गायकरांकडे माझे विशेष लक्ष; विधान परिषदेचा मार्ग मोकळा ?

रणवीर जाटव यांचे तिकीट कापल्यामुळे शिंदे समर्थक नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, मध्य प्रदेश निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. भाजपला येथे काँग्रेसचे कडवे आव्हान असणार आहे. त्यामुळेच पक्षाने उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने अशा प्रकारेच कर्नाटक निवडणुकीत आधी उमेदवारांची यादी जाहीर केली होती. तोच कित्ता आता भाजपने गिरवला आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com