BJP Leader Death : 4 टर्म आमदार, प्रदीर्घ राजकीय प्रवास अन् जनसंघाची निष्ठा; भाजपच्या दिग्गज नेत्याचं निधन!

Navnitlal Ninama Death News And Political Career: जनसंघापासून भाजपपर्यंत निष्ठा जपणारे आणि 4 वेळा आमदार राहिलेले ज्येष्ठ नेत्यांचे निधन. त्यांच्या राजकीय प्रवास आणि योगदानाबद्दल जाणून घ्या.
BJP senior leader death latest
BJP senior leader death latestSarkarnama
Published on
Updated on

BJP leader legacy and achievements: भाजपचे ज्येष्ठ नेते आणि चार वेळा आमदार राहिलेले नवनीतलाल निनामा यांच्या निधनाने राजस्थानमधील बांसवाडा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. जनसंघापासून भाजपपर्यंतचा त्यांचा दीर्घ आणि निष्ठावान प्रवास कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरला. त्यांच्या जाण्याने एका प्रभावी राजकीय पर्वाचा अंत झाल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

नवनीतलाल निनामा यांचे वय 88 होते आणि काही काळापासून ते आजारी होते. त्यांच्या निधनानंतर भाजपसह विविध सामाजिक आणि राजकीय संघटनांनी शोक व्यक्त केला आहे. वागड परिसराच्या विकासासाठी आणि आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला.

आणीबाणीच्या काळात जानेवारी 1976 ते जुलै 1977 या कालावधीत त्यांनी तुरुंगवासही भोगला. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बांसवाडा भागात मजबूत पाया रचला. साध्या आदिवासी कुटुंबातून आलेल्या निनामा यांनी आपल्या कर्तृत्वाने मोठं स्थान निर्माण केलं.

BJP senior leader death latest
Ashok Kharat case New Update : अशोक खरात प्रकरणात नाशिकमधील 'प्रसिद्ध' डॉक्टरची एन्ट्री; धक्कादायक कनेक्शन समोर

राजकीय कारकिर्द

त्यांनी 1963 ते 1975 दरम्यान न्याय पंचायत पडोळी गोर्धन येथे सचिव म्हणून काम करत आदिवासी समाजाचा आवाज बनून काम केलं. 1968 ते 1975 या काळात ते जनसंघचे जिल्हाध्यक्ष होते. त्यानंतर 1977 ते 1987 आणि 1980 ते 1998 या काळात त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली.

2001 मध्ये ते भाजप घाटोल मंडळाध्यक्ष आणि अनुसूचित जमाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष होते. 2011 मध्ये त्यांनी जनजाति मोर्चाचे जिल्हाध्यक्षपदही भूषवले. 1979 ते 1990 या 11 वर्षांच्या कालावधीत त्यांनी राजस्थान आदिवासी संघाचे अध्यक्षपदही सांभाळले.

राजकारणातील त्यांचा प्रवास 1972 मध्ये जनसंघकडून पहिली निवडणूक लढवून सुरू झाला. 1985 मध्ये ते प्रथमच भाजपकडून घाटोल मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर 1990, 2003 आणि 2013 मध्येही त्यांनी विजय मिळवला. 2018 मध्ये तिकीट न मिळाल्याने त्यांनी दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवली, मात्र पराभव झाला. नंतर त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

BJP senior leader death latest
Congress Leader Arrest : काँग्रेस नेत्यावर अटकेची टांगती तलवार! कोर्टाने जामीन अर्ज फेटाळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ

सामाजिक बांधिलकी जपणारे निनामा यांनी आपल्या कारकिर्दीत हजारो लोकांच्या समस्या सोडवल्या. त्यांनी घाटोलमधील 50 मुलींचे सामूहिक कन्यादान करून सामाजिक समतेचा संदेश दिला, तसेच अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. त्यांच्या कार्यामुळे ते कायम जनतेच्या मनात राहतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com