B. S. Yediyurappa's Big Announcement: भाजप नेत्याची मोठी घोषणा: 'मी विधानसभेची निवडणूक लढवणार नाही'

B. S. Yediyurappa News: मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
B. S. Yediyurappa
B. S. Yediyurappa Sarkarnama
Published on
Updated on

Bengaluru News: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते बी. एस. येडियुरप्पा (B. S. Yediyurappa) यांनी मोठी घोषणा केली आहे. या वेळी आपण विधानसभा निवडणूक लढवणार नाही, असे त्यांनी जाहीर करून टाकले आहे. येडियुरप्पा यांनी वयाचा हवाला देत ही घोषणा केली आहे. (BJP leader B. S. Yediyurappa's big announcement : I will not contest assembly elections)

कर्नाटक विधानसभेची निवडणूक बुधवारी जाहीर झाली आहे. राज्यात १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर येडियुरप्पा बोलत होते.

B. S. Yediyurappa
Kirit Somaiya On Girish Bapat: ‘पुण्यात भाजपचा महापौर होणार, हे आम्ही स्वप्नातही बघत नव्हतो; पण ते बापटांमुळे शक्य झाले’

ते म्हणाले की, मी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मी वयाची ८० वर्षे ओलांडल्यामुळे मुख्यमंत्रिपदाचाही राजीनामा दिला होता. माझे वय ८० वर्षांपेक्षा जास्त असले तरी मी यावेळीच नव्हे; तर पुढच्या वेळीही राज्याचा दौरा करणार आहे. या निवडणुकीतच नव्हे; तर पुढच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल, असा दावाही त्यांनी केला.

कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला पूर्ण बहुमत मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुन्हा सत्तेत येऊ. काँग्रेस भ्रष्ट आहे; म्हणूनच ४० टक्के कमिशनचे खोटे आरोप आमच्यावर करत आहे, हा मतदारांचा प्रश्न नाही, असेही येडियुराप्पा यांनी सुनावले.

B. S. Yediyurappa
Lalit Modi On Rahul Gandhi: राहुल गांधींचा पाय आणखी खोलात ; मोदी न्यायालयात जाणार ; म्हणाले, "पप्पू..साबित करो मैं..'

विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान

निवडणूक आयोगाने बुधवारी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारख जाहीर केली. राज्यात १० मे रोजी मतदान होणार आहे, त्याचा निकाल १३ मे रोजी लागणार आहे. राज्यात २२४ सदस्यांची विधानसभा आहे. सध्या कर्नाटकात भारतीय जनता पक्षाचे सरकार असून बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत.

B. S. Yediyurappa
Udayanraje Bhosale Meets Amit Shah: दिल्लीत शिवाजी महाराजांचे राष्ट्रीय स्मारक उभारावे; उदयनराजेंनी घेतली अमित शाहांची भेट

नऊ लाख मतदार प्रथमच करणार मतदान

या निवडणुकीत एकूण पाच कोटी २१ लाख ७३ हजार ५७९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यापैकी २.५९ कोटी महिला, तर २.६२ कोटी पुरुष मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, राज्यात एकूण ९.१७ लाख मतदार आहेत, जे पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. त्यांचे वय १८ ते १९ या दरम्यान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com