मेहबूबा मुफ्तींच्या टिकेला प्रत्युत्तरासाठी भाजपने घेतला डॉ. मनमोहनसिंग यांचा आधार; म्हणाले...

तुम्ही जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याकांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी स्वीकाराल का?
Narendra Modi, Manmohan Singh, Mehbooba Mufti Latest News
Narendra Modi, Manmohan Singh, Mehbooba Mufti Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

नवी दिल्ली : ब्रिटनमध्ये भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाल्यावर मोदी सरकारच्या एनआरसी आणि सीएए यासारख्या कायद्यांची उपरोधीक आठवण आलेल्या जम्मू-काश्मीरमधील आपल्या एकेकाळच्या सहकारी व पीडीपी नेत्या मेहबूबा मुफ्ती यांच्यावर भडकलेल्या भाजपने पलटवार करताना, जम्मू-काश्मीरमध्येही अल्पसंख्याक मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती स्वीकारतील का?,असा सवाल केला.

यानिमित्ताने भाजपने यूपीए सरकारच्या काळात १० वर्षे पंतप्रधानपदी राहिलेले व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वारंवार निशाण्यावर आलेले डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीचाही अप्रत्यक्ष गौरव केला आहे. (Narendra Modi, Manmohan Singh, Mehbooba Mufti Latest News)

Narendra Modi, Manmohan Singh, Mehbooba Mufti Latest News
Fadanvis : केंद्र सरकारचे १० लाख नोकरीचे लक्ष; आता राज्य सरकारही मैदानात...

ज्येष्ठ भाजप नेते व माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी मुफ्ती यांना प्रत्युत्तर देताना म्हटले की 'भारतीय वंशाचे सक्षम नेते ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान होत आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल आपण सर्वांनी त्यांचं कौतुक केलं पाहिजे. मात्र काही भारतीय नेते या निमित्तानं राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, हे अत्यंत दुर्देवी व खेदजनक आहे.'

मुफ्ती यांनी सुनक यांचे अभिनंदन करताना म्हटले होते की सुनक हे ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील हा अभिमानाचा क्षण आहे. अल्पसंख्याक असलेल्या ऋषी सुनक यांना ब्रिटनमध्ये पंतप्रधान बनवले जात आहे. भारतात मात्र आम्ही अजूनही एनआरसी आणि सीएए सारख्या विभाजनकारी आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांनी बांधील आहोत, असा उपरोधिक टोला त्यांनी मोदी सरकारला लगावला होता.

Narendra Modi, Manmohan Singh, Mehbooba Mufti Latest News
भारत जोडो पदयात्रेने सत्ताधारी हुकुमशहा घाबरले!

यामुळे संतप्त झालेल्या भाजपने तत्कालीन कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांना मैदानात उतरविले. प्रसाद यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करत मेहबुबा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, मेहबुबा मुफ्ती जी, तुम्ही जम्मू-काश्मीरमधील अल्पसंख्याकांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदी स्वीकाराल का?

ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून ऋषी सुनक (Rishi Sunak) यांची निवड झाल्यानंतर काही नेते बहुसंख्यवादाच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. मी त्यांना माजी राष्ट्रपती दिवंगत एपीजे अब्दुल कलाम आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या `असाधारण' कारकिर्दीची आठवण करून देऊ इच्छितो. सध्या आदिवासी नेत्या द्रौपदी मुर्मू आमच्या राष्ट्रपती आहेत हा अभिमानास्पद क्षण आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com