भारत जोडो पदयात्रेने सत्ताधारी हुकुमशहा घाबरले!

जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक
Dr Anil Bhamre in Meeting
Dr Anil Bhamre in MeetingSarkarnama

धुळे : देशाची एकात्मता (Unity) आणि अखंडता (Oneness) कायम राहावी, यासाठी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात भारत जोडो पदयात्रात्रा (Bharat Jodo Yatra) सुरू आहे. राहुल गांधी यांच्या या यात्रेतील नागरिकांशी संवाद (Communication) व संपर्कामुळे सत्ताधारी हुकुमशहांना (Dectector) धडकी भरली आहे. ही यात्रा देशात नवा संवाद व स्वातंत्र्य प्रस्थापित करील, असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेस (Congress) अध्यक्ष डॉ. अनिल भामरे (Dr. Anil Bhamre) यांनी केले. (Rahul Gandhi`s Bharat Jodo yatra will be in Maharashtra in November)

Dr Anil Bhamre in Meeting
शिंदे गटाकडून शुभेच्छांद्वारे ठाकरे गटात साखर पेरणी

महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या या पदयात्रेत धुळे शहरातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होतील, अशी माहिती डॉ.भामरे यांनी दिली.

भारतात एकात्मता अबाधित राखण्यासाठी आणि संपूर्ण देश संघटित करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीतर्फे कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान खासदार श्री. गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो पदयात्रा सुरू आहे. १२ राज्यांतून साडेतीन हजार किलोमीटर अंतर ही पदयात्रा पूर्ण करणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात पदयात्रेचे महाराष्ट्रात आगमन होणार आहे.

Dr Anil Bhamre in Meeting
...जेव्हा मंत्री दादा भुसे दरोडेखोराला पकडायला जातात!

नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यांतून ही पदयात्रा मार्गक्रमण करणार आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा शहर काँग्रेस कमिटीतर्फे २२ ऑक्टोबरला येथील काँग्रेस भवनात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक झाली.

शहर जिल्हाध्यक्ष डॉ. भामरे म्हणाले, की महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहर व जिल्ह्यातून यात्रेत भारत जोडो पदयात्रा ही एक ऐतिहासिक घडामोड असून, या पदयात्रेमध्ये सहभागी होणे आपल्यासाठी सुवर्णसंधी आहे. त्यामुळे काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांनीही पदयात्रेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

बैठकीत नाशिक पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणीबाबतही मान्यवरांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ, रमेश श्रीखंडे, मनपातील माजी विरोधी पक्ष नेते साबीर खान यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. जसपालसिंह सिसोदिया यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा इंटकचे अध्यक्ष प्रमोद सिसोदे, मच्छिंद्र येरडावकर, हरिभाऊ अजळकर, पीतांबर महाले, विमल बेडसे, शकील अहमद, आनंद जावडेकर, भावना गिरासे, बसंतीबाई यादव आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com