BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!

BJP leader marries younger Congress leader : 63 वर्षांच्या भाजप नेत्याने 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्यााशी चौथं लग्न केल्याने सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!
Published on
Updated on

BJP leader wedding news : वयाचं बंधन तोडत 63 व्या वर्षी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने विवाह केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय कैलाश जोशी यांचे पुत्र आणि शिवराज सिंह चौहान सरकारमध्ये मंत्री राहिलेले दीपक जोशी यांनी काँग्रेस नेत्या पल्लवी राज सक्सेना यांच्याशी लग्न केल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या विवाहाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि नेटकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

व्हायरल होत असलेल्या माहितीनुसार, दीपक जोशी आणि पल्लवी राज सक्सेना यांच्यात वयाचा मोठा फरक आहे. दीपक जोशी सध्या 63 वर्षांचे असून पल्लवी सुमारे 43 वर्षांच्या असल्याचे सांगितले जाते. म्हणजेच दोघांमध्ये जवळपास 20 वर्षांचे अंतर आहे. या कारणामुळेच ही बातमी अधिक चर्चेत आली आहे. मात्र, या विवाहाबाबत दीपक जोशी किंवा पल्लवी राज सक्सेना यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!
IAS Officers Transfer : निवडणुकीच्या धामधुमीत प्रशासनात खळबळ! 3 बड्या IAS अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली; कोणाची वर्णी कुठे?

माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार, हा विवाह 4 डिसेंबर रोजी आर्य समाज मंदिरात पार पडल्याचा दावा केला जात आहे. काही व्हायरल छायाचित्रांमध्ये दीपक जोशी पल्लवी यांच्या भांगात सिंदूर भरताना दिसत असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोमुळेच लग्न झाल्याचा दावा अधिक बळावला आहे. तसेच, या छायाचित्रांची सत्यता कोणत्याही अधिकृत माध्यमांनी दुजोरा दिलेला नाही.

BJP leader Marriage : 'वयाचं बंधन तोडलं!' 63 व्या वर्षी भाजप नेत्याचं चौथं लग्न; 20 वर्ष लहान काँग्रेस नेत्याशी बांधली लग्नगाठ, नेटकरी थक्क!
Prithviraj Chavan Epstein File : कराड की बारामती? पंतप्रधानपदाबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे भाष्य; म्हणाले एपस्टीन फाईल...

अशीही माहिती समोर येत आहे की, पल्लवी राज सक्सेना यांनी सुरुवातीला लग्नाचे काही फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले होते. मात्र, काही वेळानंतर ते फोटो हटवण्यात आले. त्यानंतर काँग्रेस नेते बृजेंद्र शुक्ला यांनी दीपक जोशी आणि पल्लवी यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांना शुभेच्छा दिल्याचेही पाहायला मिळाले.

दीपक जोशी हे मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील बागली मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. ते 1983 पासून भाजपचे सदस्य असून पक्षातील अनुभवी आणि प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात. 2023 मध्ये पक्षाकडून अपेक्षित संधी न मिळाल्याने नाराज होत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राज्यातील राजकीय घडामोडीनंतर पुन्हा एकदा ते भाजपमध्ये परतले आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत आले. दीपक जोशी यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगायचे झाले तर, त्यांची पहिली पत्नी विजया यांचे 2021 मध्ये कोरोनामुळे निधन झाले होते. सध्या चर्चेत असलेला हा विवाह त्यांचा तिसरा किंवा चौथा असल्याचीही चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com