

Prithviraj Chavan interview Epstein file: देशातील राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडण्याची शक्यता असल्याचं सूचक वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी एपस्टीन फाईलच्या वादावर भाष्य केलं आहे. पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी मराठी पंतप्रधानांबाबतही खळबळजनक दावा केला आहे. मराठी पंतप्रधान होतील, पण ते बारामती किंवा कराडमधून नसतील, असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं आहे.
19 डिसेंबर रोजी देशात राजकीय उलथापालथ होईल, असा दावा आपण कधीच केला नव्हता, तर केवळ एक शक्यता व्यक्त केली होती, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. एपस्टीन प्रकरणाशी संबंधित अनेक नवीन कागदपत्रं अजूनही समोर येत असून, त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय राजकारणासोबतच भारतीय राजकारणावरही होऊ शकतो, असं त्यांनी सांगितलं.
मराठी पंतप्रधानांच्या चर्चेवर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मराठी व्यक्ती पंतप्रधान होऊ शकते, ही शक्यता मी आधीही व्यक्त केली होती. मात्र ती व्यक्ती बारामती किंवा कराडमधली नसेल. कोण असू शकतं हे राजकारणातील जाणकारांना माहीत आहे. सध्या देशाचे पंतप्रधान ‘ऑन बोर्ड’ असल्याचं अनेक कागदपत्रांतून पुढे येत आहे, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
एपस्टीन प्रकरणाचा उल्लेख करताना चव्हाण यांनी सांगितलं की, एपस्टीन नावाच्या व्यक्तीने अनेक आंतरराष्ट्रीय आणि राजकीय नेत्यांची गुप्तपणे चित्रफीत तयार केल्याचे आरोप आहेत. या प्रकरणात अल्पवयीन मुलींच्या शोषणाचे गंभीर आरोप असून, दोषी असलेल्या सर्वांची नावं जगासमोर यायला हवीत, अशी मागणी अमेरिकेतही होत आहे.
या प्रकरणाशी संबंधित काही ई-मेल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव असल्याचे उल्लेख असल्याचं चव्हाण यांनी म्हटलं. तसेच केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी एपस्टीनची भेट का घेतली होती, याचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
एपस्टीन फाईलबाबत अमेरिकेत सध्या मोठा संघर्ष सुरू असून, अनेक कागदपत्रांमध्ये नावं काळी केली असल्यामुळे सत्य पूर्णपणे समोर येत नाही, असं चव्हाण यांनी सांगितलं. या फाईलमध्ये भारतीय नावं असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.