Devaraje Gowda : ... म्हणून प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणाऱ्या भाजप नेत्यास झाली अटक!

Prajjwal Revanna sex scandal : जाणून घ्या, नेमकं काय आहे कारण आणि पोलिसांनी काय केले आहेत आरोप?
Devaraje Gowda
Devaraje GowdaSarkarnama

Karnataka News : भाजपा नेते देवराजे गौडा यांना प्रज्ज्वल रेवण्णाशी संबंधित एक व्हिडीओ लीक केल्याच्या आरोपात अटक केली गेली आहे. कर्नाटक पोलिसांनी गौडा यांना शुक्रवारी रात्री अटक केली. त्या व्हिडीओमध्ये प्रज्ज्वल रेवन्ना दिसत आहे.

कर्नाटक पोलिसांच्या मते, देवराजे गौडाला हासन पोलिसांकडून मिळालेल्या नोटीशीनंतर चित्रदुर्ग जिल्ह्यातील गुलिहाल टोल नाक्यावरून अटक करण्यात आली. तर देवराजे गौडाने व्हिडीओ लीक करण्याच्या आरोपांना फेटाळले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Devaraje Gowda
Amit Shah : अमित शाह पंतप्रधान होणार? केजरीवालांच्या दाव्याला शाहांचेच उत्तर

प्राप्त माहितीनुसार, देवराजेच ते व्यक्ती आहेत, ज्यांनी कथितरित्या रेवण्णाकडून अनेक महिलांचे कथितरित्या लैंगिक शोषणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना कळवले होते आणि पक्षाकडे हसन मतदारसंघातून जनता दल(एस) खासदार प्रज्ज्वल रेवन्नास उमेदवारी न देण्याची मागणी केली होती.

एवढच नाहीतर देवराजे गौडा यांनी मागील महिन्यात दावा केला होता की, त्यांनी प्रज्ज्वल रेवण्णाची क्लिप समोर येण्याच्या अनेक महिने आधी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना रेवण्णाच्या सेक्स व्हिडीओंबाबत कळवले होते. मात्र गौडा यांच्या या दाव्यावर कर्नाटक भाजपचे प्रमुख बी वाय विजयेंद्र यांनी म्हटले होते की, त्यांना अशी कोणत्याही प्रकारची माहिती मिळाली नव्हती.

Devaraje Gowda
Arvind Kejriwal : ‘मोदी पंतप्रधान झाले तर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकतील’, अरविंद केजरीवालांच्या दाव्याने खळबळ

दुसऱ्या बाजूला रेवण्णाचे प्रकरण उघडकीस आल्याच्या काहीदिवसानंतरच देवराजे गौडाविरोधात एका महिलेने लैगिंक शोषणाची तक्रार दाखल केली होती. आपल्या तक्रारीत त्या महिलेने म्हटले होते की, गौडा तिची संपत्ती विक्री करण्यास मदत करण्याच्या बहाण्याने जवळपास दहा महिने तिचे लैंगिक शोषण करत होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com