नेते पक्ष सोडत असल्याने हादरलेल्या भाजपकडून प्रदेशाध्यक्षांना डच्चू

खासदार डॉ. सुकांत मजूमदार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
BJP West Bengal
BJP West BengalSarkarnama
Published on
Updated on

कोलकता : विधानसभा निवडणूक जिंकत पश्चिम बंगालमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी निकराचे प्रयत्न करूनही अपयश आलेल्या भाजपला वारंवार धक्के बसत आहेत. आमदार, खासदार, नेते पक्षाला रामराम ठोकत असल्यानं भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यातच आता भाजपनं थेट प्रदेशाध्यक्षांनाच डच्चू दिला आहे. त्यांच्यावर राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

भाजपने दिलीप घोष यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार काढून घेतला आहे. त्यांच्याजागी खासदार डॉ. सुकांत मजूमदार यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर घोष यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आलं आहे. बंगालमध्ये घोष यांच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. या निवडणुकीत भाजपनं आधीच्या निवडणुकीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. पण अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत.

BJP West Bengal
...हा सल्ला मोदी-शहांना द्या! राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्री ठाकरेंचे खरमरीत उत्तर

त्यातच निवडणुकीनंतर अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकला. निवडणुकीआधी तृणमूलमधून आलेले नेते घरवापसी करत आहेत. खासदार बाबूल सुप्रियो यांनी मागील आठवड्यातच तृणमूलमध्ये प्रवेश केला. तसेच मुकूल रॉय यांच्यासह आतापर्यंत चार आमदारांनी भाजपची साथ सोडली आहे. तसेच आणखी काही आमदार तृणमूलच्या वाटेवर असल्याने बंगाल भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.

BJP West Bengal
तालिबानमध्ये यादवी : सर्वेसर्वा अखुंजादाचा मृत्यू तर उपपंतप्रधान ओलीस?

सध्या विधानसभेच्या तीन जागांसाठी तर राज्यसभेच्या एका जागेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. ही निवडणूक काही दिवसांवर आलेली असतानाच भाजपनं मोठा निर्णय घेत घोष यांना बदललं आहे. घोष यांना बदलण्यात आल्यानं बंगाल भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचं बोललं जात आहे. तृणमूलमधून आलेल्या नेत्यांना थांबवण्यात त्यांना अपयश येत आहे. भाजपची स्थिती बळकट होण्याऐवजी सध्या सातत्याने धक्के बसत आहेत.

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त केल्यानंतर घोष म्हणाले, पाच वर्षांपुर्वी मी पदभार स्वीकारला तेव्हा बंगालची स्थिती वेगळी होती. भाजपला फारसे स्थान नव्हते. पण आता भाजप प्रमुख विरोधी पक्ष बनला आहे. तृणमूलप्रमाणे आमची ताकद आहे. मला खूप अनुभव मिळाल्याने पक्षानं मला मोठी जबाबदारी दिली, असं घोष यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com