MB Bhanuprakash Death: कर्नाटकात इंधन दरवाढविरोधात आंदोलन करताना भाजप नेत्याचा मृत्यू

Karnataka BJP News : ...तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले.
Bhanuprakash
Bhanuprakash Sarkarnama
Published on
Updated on

BJP Vs Karnataka fuel price hike : कर्नाटकातील भाजप नेतेत एमबी भानुप्रकाश यांचे निधन झाले आहे. कर्नाटकातील इंधन दरवाढ विरोधात आयोजित मोर्चामध्ये ते सहभागी झाले होते. यावेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. विशेष म्हणजे भानुप्रकाश हे या मोर्चाचे नेतृत्व करत होते. त्यांनी पक्षाच्या आंदोलक कार्यकर्त्यांना मोर्चाच्या ठिकाणी मार्गदर्शनही केले होते.

यानंतर ते जेव्हा त्यांच्या कारमध्ये बसत होते, तेव्हा त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते तिथेच कोसळले. यानंतर तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

इंधन दर वाढीवरून कर्नाटकातील भाजप नेते सीटी रवि(CT Ravi) यांनी मुख्यमंत्री सिद्धारमय्यांवर निशाणा साधला आहे. त्यांनी प्रश्न उपस्थित केला की मुख्यमंत्री दुप्पटी भूमिका घेणारे आहेत का? भाजपने म्हटले की, मुख्यमंत्री बनण्याआधी सिद्धरामय्या यांनी म्हटले होते की, सरकार इंधनाच्या किंमती दहा रुपयांनी कमी करेल.

मात्र ते मुख्यमंत्री बनल्यापासून इंधन दरात दोनदा वाढ झाली आहे. जर सरकारच्या तिजोरीत पैसा आहे तर जन्म आणि मृत्यू प्रमाणपत्र, स्टॅम्प ड्यूटी शुल्क, उत्पादन शुल्क आणि वीज बिलाच्या दरात का वाढ केली गेली?

Bhanuprakash
Shripad Naik : सलग सहाव्यांदा लोकसभा गाठणाऱ्या श्रीपाद नाईकांना व्हायचंय गोव्याचं मुख्यमंत्री?

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी(Hardeep Singh Puri) यांनी म्हटले की, भारत एकमेव देश आहे जिथे प्रतिनिधी कालावधीत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये जवळपास दोन टक्के कमी आली आहे. त्यांनी हेही म्हटले की या कालावधीदरम्यान डिझेलच्या किंमीती वाढण्याऐवजी कमी झाल्या.

Bhanuprakash
Assembly By Elections : विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल वाजला; भाजप अन् काँग्रेसकडून उमेदवार जाहीर!

केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी याचे कारणही सांगितले, ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Narendra Modi) वर्ष 2022 मध्ये दोनदा पेट्रोल आणि डिझेलवर केंद्राकडून आकारण्यात आलेले उत्पादन शुल्क कमी केले. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी झाल्याचे दिसले. त्यांनी पुढे म्हटले की भाजपशासित राज्यांनी ही पेट्रोल आणि डिझेलवर लागणारा 'वॅट' कमी केला. वॅटची आकडेवारी बघितली की ही बाब स्पष्ट होते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com