BJP Manifesto : 500 रुपयांत गॅस सिलिंडर, विवाहित महिलांना 12 हजार रुपये; छत्तीसगडच्या जाहीरनाम्यात भाजपनं...

Chhattisgarh Election 2023 : जाहीरनाम्यात जनतेला 20 आश्वासने देण्यात आली आहेत.
BJP Manifesto Chhattisgarh
BJP Manifesto ChhattisgarhSarkarnama
Published on
Updated on

Chhattisgarh Assembly Elections 2023 : गृहमंत्री अमित शाह यांनी छत्तीसगडसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. महतरी वंदन योजनेअंतर्गत विवाहित महिलांना 12 हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत देणार असल्याची मोठी घोषणा करण्यात आली आहे. रायपूरमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 'छत्तीसगड 2023 साठी मोदींची हमी' नावाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात जनतेला 20 आश्वासने देण्यात आली आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार असताना आम्ही छत्तीसगडमधून नक्षलवाद संपवला होता. छत्तीसगडचे सरकार जातीवाद आणि तुष्टीकरण करत असल्याचा आरोप शाह यांनी केला. भूपेश बघेल हे छत्तीसगडच्या विकासातील सर्वात मोठा अडथळा आहे, असे शाह म्हणाले. ते म्हणाले, "मी येथे अनेक ओबीसी नेत्यांना भेटलो आणि त्यांनी मला सांगितले, की छत्तीसगडमध्ये सरकार बदलणार आहे. आमच्या सरकारने छत्तीसगडमध्ये वेगाने विकास केला आहे."

भाजपने 500 रुपयांत गॅस सिलिंडर, एक लाख सरकारी नोकऱ्या देण्याचं आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. "भाजपचा हा जाहीरनामा नसून एक संकल्प पत्र आहे. आमच्या संकल्पाची पूर्तता करून आम्ही 2000 मध्ये छत्तीसगड राज्याची स्थापना केली," असे शाह म्हणाले.

BJP Manifesto Chhattisgarh
Jitendra Awhad: विरोधक आमदारांचे तालुके वगळले; दुष्काळावरून आव्हाड संतप्त...
  • छत्तीसगडमधील 5 शक्तिपीठांचा विकास केला जाईल

  • सरकार तुन्हार दुवार - या अंतर्गत पंचायत स्तरावर दीड लाख बेरोजगारांची भरती केली जाईल.

  • छत्तीसगडमधील लोकांना रामल्लाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला नेण्यात येणार आहे.

  • एम्सच्या धर्तीवर प्रत्येक विभागात छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स उघडले जाईल आणि आयआयटीच्या धर्तीवर छत्तीसगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रत्येक लोकसभेत उघडली जाईल.

  • विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जाण्यासाठी DBT मधून मासिक प्रवास भत्ता दिला जाईल.

  • नया रायपूर हे मध्य भारताचे इनोव्हेशन हब असेल. यामुळे 6 लाख रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

  • राणी दुर्गावती योजना - बीपीएल मुलींच्या जन्मावर दीड लाख रुपयांचे हमी प्रमाणपत्र.

  • गरीब कुटुंबातील महिलांना 500 रुपयांत गॅस सिलिंडर देण्यात येईल.

  • भ्रष्टाचाराबाबत तक्रार निवारण आणि देखरेखीसाठी वेब पोर्टल.

  • गुंतवणुकीसंदर्भात दरवर्षी जागतिक दर्जाची परिषद आयोजित केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com