Baijnath Singh Yadav Join Congress : ज्योतिरादित्य शिंदेंसोबत BJP मध्ये सामील झालेल्या बड्या नेत्याची काँग्रेसमध्ये घरवापसी

MP election : आपल्या समर्थकांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत शक्तीप्रदर्शन केलं.
Baijnath Singh Yadav Join Congress  News
Baijnath Singh Yadav Join Congress News Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Congress : आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधीच मध्यप्रदेशात राजकीय समीकरण बदलण्यास सुरवात झाली आहे. केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे निकटवर्तीय बैजनाथ यादव यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, राष्ट्रीय महासचिव दिग्विजयसिंग आणि माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांच्या उपस्थितीतीत यादव यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवपुरी येथील यादव यांनी २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचं भाजप नेत्यासोबत न जमल्यानं त्यांनी पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याची चर्चा आहे.

Baijnath Singh Yadav Join Congress  News
MLA Funds Issue: दादा भुसे अडचणीत ; सहा आमदार न्यायालयात जाणार, नियोजन विभागाकडे..

बैजनाथ यादव यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी सुमारे ४०० गाड्याचा ताफा होता. आपल्या समर्थकांसह त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करीत शक्तीप्रदर्शन केलं.

Baijnath Singh Yadav Join Congress  News
Manipur Violence : आमदाराच्या घरानंतर आता मंत्र्याचं घर जाळलं ; मणिपुरमध्ये हिंसाचार..

तर भाजपचे माजी आमदार आणि मंत्री अंखड प्रताप सिंह यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. यादव आणि अंखड प्रताप सिंह यांनी पक्ष सोडल्याने भाजपला मोठा झटका बसला आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी जमत नसल्याचे यादव यांनी राजीनामा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

मध्यप्रदेशात या वर्षांच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होत आहे. भाजप सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे तर काँग्रेसने त्यांना बाहेरचा सत्ता दाखवण्यासाठी कंबर कसली आहे.

२०१८ च्या विधानसभा निवडणुकीत मध्यप्रदेशात काँग्रेसला बहुमत मिळाले होते. २०२० मध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या हजारो समर्थकांसह काँग्रेसमध्ये बंडखोरी करीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर कमलनाथ सरकार कोसळलं होत.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com