Manipur Unrest : मणिपुरमध्ये बुधवारी महिला आमदाराचे घराला आग लावल्यानंतर काल (गुरुवारी) केंद्रीय मंत्र्याचे घर समाजकंटकांनी जाळले. यामुळे या प्रकरणाला आता वेगळं वळण लागलं आहे.
मणिपुरमध्ये हिंसा थांबण्याचे नाव घेत नाही, गुरुवारी रात्री इफाळमधील कोनबा येथे केंद्रीय मंत्री आरके रंजन यांचे घर आगीत जळाले. मध्यरात्री हा प्रकार घडला. गेल्या दोन दिवसापासून येथील वातावरण अधिक तापलं आहे. गोळीबारात दोन जणांचा मृ्त्यू झाला आहे. दहा जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री एन बीरेन सिंह हे राज्यात शांतता राखण्याचा प्रयत्न करीत आहेत.
बुधवारी पश्चिम इंफाळ जिल्ह्यात लाम्फेल परिसरात मणिपुरच्या एकमेव महिला मंत्री नेमचा किपगेन यांच्या घराला समाजकंटकांनी आग लावली आहे. मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य व केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत. लष्काराचे जवानांना तैनात करण्यात आले आहे.
नेमचा किपगेन यांच्या घराला आग लावली त्यावेळी त्यांच्या घरी कुणी नसल्याने अनर्थ टळला. आगीची माहिती मिळताच अग्निशामक दल व प्रशासन यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे. या घटनेची जबाबदारी अद्याप कुठल्याही घटकाने घेतलेली नाही. किपगेन या कुकी समाजाच्या नेत्या आहेत.
महिनाभरापासून मणिपुरात मेइती आमि कुकी समाजातील काही जणांमध्ये झालेल्या वादामुळे हिंसाचार झाला. यात अद्यापपर्यंच शंभरहून अधिक जणांना मृत्यू झाला आहे. पाचशे पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले आहेत.
मंगळवारी रात्री कंग्पोक्पी जिल्ह्यातील खमेन्लोकमध्ये बिगर आदिवासी आणि आदिवासी गटांमध्ये झालेल्या गोळीबारात ११ लोकांचा मृत्यू झाला. तर ४-५ लोक बेपत्ता आहेत. ९ मृतदेहांची ओळख पटली आहे. १० लोक जखमी झाले आहेत.
राज्यात मोबाइल इंटरनेट बंदी कायम आहे. १६ पैकी ११ जिल्ह्यांत अजूनही संचारबंदी आहे. सुग्नू भागात जीवनावश्यक वस्तूंची टंचाई आहे. समाजकंटकांनी प्रमुख रस्ते बंद केले आहेत. यामुळे रसद-औषध पोहोचवताना अडचणी येत आहेत. गॅसचे सिलिंडर अडीच हजारांत मिळत आहे. लष्कराने बुधवारी हेलिकॉप्टरद्वारे जीवनावश्यक साहित्य पुरवले. अनुसूचित जातीचा दर्जा मिळावा, अशी मागणी मेहती समाजाची आहे.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.