
Delhi CM BJP Decision : दिल्लीतील नवीन सरकारच्या स्थापनेबाबत एक महत्तावाची अपडेट समोर आली आहे. उद्या(17 फेब्रुवारी) दुपारी 3 वाजता दिल्ली भाजप प्रदेश कार्यालयात भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक होईल. ज्यामध्ये दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांची निवड होईल. 18 फेब्रुवारी रोजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. ही माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. शपथविधी सोहळा भव्य होणार असल्याचेही सांगितले जात आहे.
दिल्ली विधानसभा (Delhi Vidhan sabha ) निवडणुकीत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत, अडीच दशकानंतर सत्तेत वापसी केली आहे. तर आम आदमी पार्टीची मात्र विजयाची हॅटट्रिक हुकली आहे. दुसरीकडे काँग्रेसने मात्र शुन्याची डबल हॅटट्रिक केली आहे. त्यामुळे दिल्लीची यंदाची निवडणूक देशभरात प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे. सर्वच पक्षांनी हा निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, मात्र यामध्ये भाजपने बाजी मारली आहे.
भाजपने(BJP) एकूण 70 पैकी 48 जागांवर विजय मिळवला, तर आम आदमी पार्टीला केवळ 22 जागा मिळाल्या आहेत. विशेष बाब म्हणजे या निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांच्यासारखे दिग्गज नेते पराभूत झाले आहेत.
त्यामुळे यंदा आता दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री असणार हे स्पष्ट आहे. त्याचदृष्टीने आता भाजपमध्ये घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान मोदी अमेरिका दौऱ्यावरून परतल्याने आता मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय लवकरच होण्याची चिन्हं आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी भाजपमध्ये अनेक नावंही चर्चेत आहेत. मात्र पक्ष श्रेष्ठी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात, की अन्य राज्यांप्रमाणे दिल्लीतही धक्कातंत्र वापरलं जात, हे लवकरच स्पष्ट होईल.
दिल्लीच्या आठव्या विधानसभेत महिलांची भागीदारी कमी झाली आहे. मात्र यंदा पोस्ट ग्रॅज्युएट आमदारांच्या संख्येत भर पडली आहे. पीआरएस लेजिसलेटिव्ह रिसर्चच्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.