BJP Plan For Lok Sabha : सोनिया गांधी, डिंपल यादवांनाही पराभूत करणार; १६० जागांसाठी भाजपचा काय आहे 'मास्टर प्लॅन' ?

BJP Target Sonia Gandhi : देशभरात अमित शाह आणि जे.पी. नड्डा घेणार सभा
Dimple Yadav, Sonia Gandhi
Dimple Yadav, Sonia GandhiSarkarnama

Delhi Political News : नोव्हेंबरमध्ये राजस्थान, मध्यप्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. तर त्यानंतर पुढील वर्षी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाकडून सुरु आहे. यामध्ये भाजपकडून लोकसभेची जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून आतापर्यत जिंकू न शकलेल्या १६० जागा जिंकण्याचा 'मास्टर प्लॅन' तयार केला असून त्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी व समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्या मैनापुरी मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. याठिकाणी ही भाजपकडून रणनीती आखली जात आहे. (Latest Political News)

Dimple Yadav, Sonia Gandhi
Chetan Tupe With Ajit Pawar : चेतन तुपे अजितदादांच्या मांडीला मांडी लावून बसले; राष्ट्रवादीत कोण कुठे, संभ्रम कायम

भाजप (BJP)कडून आतापर्यत जिंकू न शकलेल्या १६० जागा जिंकण्याचा 'प्लॅन' एक वर्षांपासून तयार केला आहे. त्यांनी कमजोर वाटत असलेल्या १६० मतदारसंघात कामही सुरु केले आहे. या १६० जागा जिंकण्यासाठी ४० 'क्लस्टर' तयार करण्यात आले आहेत. देशभरातील या मतदारसंघांचा एकत्रितरित्या काही बैठका घेण्यात आल्या आहेत. यासाठी संबंधित राज्यातील पदाधिकारी, नेत्यांशी संवाद साधून तेथील स्थिती जाणून घेतली आहे. आता त्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी केंद्रीय मंत्री व पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.

या १६० मतदारसंघात उत्तरप्रदेशातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) व समाजवादी पक्षाच्या खासदार डिंपल यादव यांच्या मैनापुरी मतदारसंघ येत आहेत. त्याठिकाणी भाजपकडून प्लॅन तयार करण्यात आला आहे. आगामी काळात याठिकाणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची सभा हॊणार आहे. त्यांच्या सभेच्या माध्यमातून या ठिकाणी वातावरण निर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न असणार आहे, त्यासाठी रणनीती आखली जात आहे.

Dimple Yadav, Sonia Gandhi
Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती अन् बीडमध्ये 'दादा गटा'ची डाळ शिजली नाही; नेमकं काय झालं ते रोहित पवारांनी सांगितलं

'एनडीए'समोर आता 'इंडिया'चे तगडे आव्हान असणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने २०२४ मध्ये लोकसभेच्या ३०० पेक्षा जास्त जागा मिळवण्याचे लक्ष्य ठरवले आहे. त्या दृष्टीने केंद्रीतील नेत्यांसह राज्या-राज्यातील मंडळीही कामाला लागलेली आहे. याचाच याचाच एक भाग म्हणून देशभरातील दुसऱ्या क्रमांवर भाजप राहिलेल्या जागांसाठी रणनीती तयार केली आहे. या जागांपैकी काही जागा जरी पदरात पाडता आल्या तरी मोठा विजय प्राप्त होऊ शकतो, असा कयास भाजपच्या वतीने लावला जात आहे. भाजपचा हा प्लॅन यशस्वी होणार का, याकडे देशाचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com