Mumbai Political News : राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यभर सभा घेऊन शक्तीप्रदर्शन करत आहेत. आमदार अजितदादांसोबत गेले तरी कार्यकर्ते, लोकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा पवारांनी वारंवार केला आहे. याची प्रचिती बारामती आणि बीडच्या सभेत आल्याचा दावा आमदार रोहित पवारांनी केला आहे. 'या दोन्ही सभेत पवारांविरोधात एकही शब्द जनता ऐकून घेत नाही, तर मोदी-शाहांचे गुणगान गायले की टाळ्याही मिळत नाहीत', असे म्हणत रोहित यांनी दादा गटाची डाळ शिजत नसल्याचेच एकप्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. (Latest Political News)
बंडखोरांना २०२४ मध्ये आसमान दाखवण्यासाठी Sharad Pawar शरद पवारांनी पायाला भिंगरी बांधली आहे. त्यांनी मंत्री छगन भुजबळांचा गड असलेल्या येवला, धनंजय मुंडेंच्या बीड जिल्ह्यात आणि हसन मुश्रीफांना कोल्हापुरात जाऊन जोरदार टीका केली. अजित पवारांनी बारामतीत शक्तीप्रदर्शन केल्यानंतर पवारांच्या बीडच्या सभेला प्रत्युत्तर दिले. यावेळी जोरदार स्वागत झाले असले तरी नेत्यांच्या भाषणाला लोकांनी प्रतिसाद दिला नसल्याचे बोलले जात आहे. यातच रोहित पवारांनीही या सभेवर ट्विट करून अजित पवार गटाचा डिवचले आहे.
रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, "बीडमध्ये मोठे स्वागत झाले, पण एका मंत्र्याने त्यासाठी सत्तेचा पुरेपूर वापर केला, हेही नजरेआड करता येणार नाही. या सभेत शरद पवारांविरोधात एका मंत्र्याचे सूर निघायला लागले, त्याला लोकांनीच विरोध केला. परिणामी संबंधित मंत्र्याला दोन मिनिटांतच भाषण गुंडाळावे लागले. तसेच भाजपची आरती गायली त्यावेळी बारामतीप्रमाणेच स्वाभिमानी बीडकरांनीही एकही टाळी वाजवली नाही. खुर्च्याही रिकाम्या व्हायला लागल्या, यातच सर्व आले. कारण बारामती असो किंवा बीड… संपूर्ण महाराष्ट्रातील जनता हुशार आणि स्वाभिमानी आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले", असे म्हणत रोहित यांनी अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
'पाचाचे पन्नास' करण्याची धमक असल्याचे सांगून राष्ट्रवादीच्या बंडखोरांना लोकांत जाऊन घेरणार असल्याचे शरद पवारांनी स्पष्ट केले आहे. यावर तुम्ही जाल तेथे आम्ही उत्तर सभा घेणार असल्याचे आव्हान अजित पवारांनी दिलेले आहे. यानुसार पवारांच्या बीडच्या सभेला अजित पवारांनी सभा घेतली. या सभेला मात्र सत्तेचा वास असल्याची टीका रोहित पवारांनी केली. तसेच राज्यातील जनता सुज्ञ असल्याचे सांगून ती पवारांच्या मागेच असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.