Madhya Pradesh Politics : भाजप डाव टाकणार; शिवराजसिंहांसह ४० आमदारांना देणार धक्का

Madhya Pradesh BJP Politics : मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे.
Madhya Pradesh Politics :
Madhya Pradesh Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Madhya Pradesh Politics : मध्य प्रदेशात वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. या वेळी सत्ताधारी भाजपा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने रिंगणात उतरत आहे. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मध्य प्रदेशात विद्यमान मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळाचे तिकीट कापले जाऊ शकते, अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे. यामुळे मध्य प्रदेशात राजकारण तापण्याची शक्यता आहे.

2018 च्या चुकांमधून धडा घेत भाजपने या वेळी आपल्या रणनीतीत बरेच बदल केले आहेत. या वेळी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याशिवाय पक्षाने इतर ज्येष्ठ नेत्यांनाही निवडणूक प्रचारात पुढे केले आहे. मध्यप्रदेशातील सत्ताविरोधी वातावरण शमवण्यासाठी पक्षाने आपल्या ४० हून अधिक विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करण्याची तयारीही केली आहे.

Madhya Pradesh Politics :
India-Canada Relation : भारत-कॅनडा संबंध बिघडल्यास 'या' गोष्टींवरही होणार गंभीर परिणाम

40 हून अधिक आमदारांची तिकिटे रद्द होणार!

मिळालेल्या माहितीनुसार, पक्षाने राज्यातील प्रत्येक विधानसभेच्या जागेवरील विजय आणि पराभवाचे समीकरण आणि सध्याच्या आमदारांची सक्रियता, लोकप्रियता, वय, जनसंख्या आणि विजयाची क्षमता याबाबत अनेक पातळ्यांवर विस्तृत संशोधन केले आहे. पक्षाने मध्य प्रदेशातील इतर राज्यांतील नेते आणि विशेषत: आमदारांना उभे करून प्रत्येक विधानसभेच्या जागेची ग्राउंडवरील माहिती गोळा केली आहे. त्याच आधारावर पक्षाने आपल्या विद्यमान आमदारांना मोठ्या प्रमाणावर बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी पक्ष आपल्या 40 हून अधिक विद्यमान आमदारांची तिकिटे रद्द करून त्यांच्या जागी तरुण आणि नवीन चेहऱ्यांना उभे करण्याची तयारी करत आहे. मात्र, ज्या नेत्यांची तिकिटे कापली जाणार आहेत त्यांच्या यादीत काही विद्यमान आमदारांचाही समावेश आहे. ज्यांनी वयाची ७५ वर्षे ओलांडली आहेत.

2018 च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा किंचित जास्त मते मिळवूनही भाजपाने राज्यात केवळ 109 जागा जिंकल्या होत्या. तर 114 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. 2018 मध्ये मध्य प्रदेशात भाजपला 41.02 टक्के मते मिळाली होती. तर काँग्रेसला 40.89 टक्के मते भाजपापेक्षा थोडी कमी मिळाली. पुढे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या गटातील आमदारांच्या राजीनाम्यामुळे कमलनाथ यांचे सरकार पडले आणि शिवराज सिंह चौहान पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले.

सिंधिया गटातून राजीनामा देणारे अनेक आमदार भाजपच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकून आमदार झाले. सध्या मध्य प्रदेश विधानसभेत भाजपच्या आमदारांची संख्या १२७ असून यापैकी ४० हून अधिक आमदारांची तिकिटे रद्द करण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच भाजपने नुकतीच स्वतःसाठी कमकुवत समजल्या जाणाऱ्या ३९ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Madhya Pradesh Politics :
Tamilnadu Politics : दक्षिणेत कर्नाटकनंतर भाजपला मोठा धक्का ; 'एआयएडीएमके' एनडीएतून बाहेर

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com