BJP Minority Morcha : मुस्लिम वोट बँकेला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी भाजपने (BJP)मास्टर प्लॅन तयार केला आहे. गेल्या काही दिवसापासून मुस्लिम मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. (BJP Minority Morcha News update)
नुकत्याच झालेल्या भाजपच्या बैठकीत पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना सर्व समाजापर्यंत पोहचण्यासाठी सूचना दिल्या आहेत. या आदेशानंतर भाजप अल्पसंख्याक मोर्चा सक्रिय झाला आहे.
भाजपच्या विविध योजना, लोककल्याणासाठी घेतलेले निर्णय, पक्षाची ध्येयधोरणे मुस्लिम समाजापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचा पुढील टप्पा म्हणजे आता सूफी-संतांसोबत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सूफी-संतांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुस्लिम समाजापर्यंत पोहचण्यासाठी भाजपने रणनीती आखली आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी (२०२४) भाजपने सूफी-संतांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे, विविध कल्याणकारी योजना पोहचविण्यासाठी एक व्यापक कार्यक्रम तयार केला आहे. भाजपने अल्पसंख्याक मोर्चाने ही योजना केली आहे. यामुळे मुस्लिम वोट बॅक भाजपकडे येईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींना आहे.
"सूफी-संत परिसंवादा"चे आयोजन
येत्या मार्चमध्ये "सूफी-संत परिसंवादा"चे आयोजन भाजपने केले आहे. पक्षाचे कार्यकर्ते आपल्या राज्यात सूफी-संतांशी संपर्क साधून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. याची सुरवात राजस्थान आणि दिल्ली येथून होत आहे.
या वर्षांच्या अखेरीस राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर या परिसंवादाला महत्व आहे. "सूफी-संत परिसंवाद" मार्चमध्ये देशभर सुरु होणार आहे. त्याचे आयोजन भाजप अल्पसंख्याक मोर्चाने केले आहे.
समाजभिमुख प्रकल्प -जमाल सिद्दीकी
भाजप अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास ' हा केवळ भाजपचा नारा नसून एक समाजभिमुख प्रकल्प आहे.
अजमेर शरीफ आणि हजरत निजामुद्दीन तसेच अन्य मुस्लिम स्थळांमधील धार्मिक नेत्यांना या परिसंवाद निमंत्रित करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी सूफी-संतांच्या भेटीचे आयोजन करण्यात येणार आहे.
६० मुस्लिम बहुल लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रीत
भाजपने देशातील ६० मुस्लिम बहुल लोकसभा मतदार संघात लक्ष केंद्रीत करण्यात सुरवात केली आहे. मुस्लिम समाजपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहचणे गरजेचे आहे, या मुद्दांवर भाजपने आपली रणनीती आखली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.