मलिक हसतच ईडीच्या कार्यालयाबाहेर आले अन् वज्रमूठ दाखवत म्हणाले...

नबाव मलिक यांना मंगळवारी ईडीने अटक केली आहे. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली.
Nawab Malik
Nawab MalikSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना मंगळवारी ईडीने (ED) अटक केली आहे. तब्बल ७ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ही कारवाई केली. अटक केल्यानंतर मलिकांना आरोग्य तपासणीसाठी नेण्यात आले. त्यावेळी ईडीच्या कार्यालयाबाहेर येताना मलिकांनी हाताची वज्रमूठ दाखवली. बाहेर येताना ते हसतच कार्यकर्त्यांना सामोरे गेले.

बुधवारी सकाळी पाच वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी मलिकांच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर ७ वाजता मलिक यांना ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुमारे सात तास त्यांची चौकशी केल्यानंतर अटक करण्यात आली. चौकशीला सहकार्य करत नसल्याचे कारण त्यासाठी देण्यात आल्याचे समजते.

Nawab Malik
जर तो मुस्लीम कार्यकर्ता असेल तर त्याला दाऊदचा माणूस म्हटले जाते- शरद पवार

मलिकांना अटक केल्यानंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागला. त्यानंतर मलिकांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी कार्यालयाबाहेर येताना मलिकांनी प्रवेशद्वारावरच वज्रमूठ दाखवत कार्यकर्त्यांना सूचक संकेत दिले. बाहेर येताना ते हसतच आले. यावेळी बोलताना त्यांनी झुकेंगे नहीं और भी लढेंगे, सबको एक्सपोज कर देंगे अशी प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान त्यांना आता मेडिकलसाठी जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले आहे. ईडीमधील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंडरवर्ल्ड आणि मलिक यांचे थेट आणि कमी पैशात व्यवहार झाले होते. याच बाबतचे पुरावे अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान सापडले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी ईडीने मुंबईतील काही जमीन व्यवहारांशी संबंधित अंडरवर्ल्डशी संबंधित इकबाल कासकर आणि हसीना पारकर यांची चौकशी केली होती. त्यानंतर याच प्रकरणाशी संबंधित काही लोकांची ही चौकशी करण्यात आली होती. भाजपचे नेते आणि राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही दिवसांपूर्वी नवाब मलिक यांच्यावर याबाबत आरोप केले होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com