
BJP MLA vs Chief Secretary Controversy Maharashtra : कर्नाटक राज्यात भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते चांगलेच अडचणीत येऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी संघाचे नेते दत्तात्रय होसबाळे यांच्याविरोधात पोलिस तक्रार दाखल झाली होती. आता विधान परिषदेचे भाजप सदस्य एन. रविकुमार अडचणीत आले आहे.
मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याविषयी त्यांनी अपमानस्पद विधान केले आहे. एन. रविकुनार यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून, विधान परिषद सभापतींकडे देखील तक्रार दाखल झाली आहे. एन. रविकुमार यांचे सदस्यपद देखील धोक्यात आल्याचे संकेत आहेत.
कर्नाटकमधील विधानसौध इथल्या महात्मा गांधी पुतळ्यासमोर निषेध सभा झाली होती. तिथं बोलताना विधान परिषदेतील विरोधी पक्षाचे मुख्य प्रतोद एन. रविकुमार यांनी राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले. यामुळे राज्यात भाजपविरोधात (BJP) गदारोळ निर्माण झाला आहे.
रविकुमार यांनी, राज्याच्या मुख्य सचिव शालिनी रात्रभर राज्य सरकारसाठी आणि दिवसभर मुख्यमंत्र्यांसाठी काम करतात, असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानामुळे राज्यात भाजपविरोधात मोठा वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात काँग्रेसने (Congress) विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्याकडेही रविकुमार यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दरम्यान, एन. रवी कुमार यांच्याविरुद्ध विधानसौध पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. जेपी नगरच्या नंदादीपा महिला संघाच्या अध्यक्षा नागररत्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी रविकुमार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून घेत, या प्रकरणाच्या चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस बजावली जाईल आणि पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत.
तसेच चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रय होसबाळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द वगळण्याची मागणी केली होती. त्यावरून देखील कर्नाटकमध्ये वाद झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्याविरुद्ध युवक काँग्रेस आक्रमक होत, होसबाळेंविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारविरुद्ध भाजपचा संघर्ष अधिकच तीव्र झाल्याचे दिसते आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.