
Karnataka Police Complaint RSS: कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अन् भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष कायद्याच्या चौकटीपर्यंत येऊन ठेपला आहे. राष्ट्रीय स्वयंसे संघाचे नेते दत्तात्रय होसबाळे यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द वगळण्याची मागणी केली. याविरुद्ध युवक काँग्रेस आक्रमक झाली असून, होसबाळेंविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. यामुळे कर्नाटकमध्ये काँग्रेस सरकारविरुद्ध भाजपचा संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
युवक काँग्रेसच्या (Congress) शहर शाखेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते दत्तात्रय होसबाळे यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेत ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द वगळण्याची मागणी करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सहकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांच्याविरुद्ध औपचारिक तक्रार दाखल केली आहे. कायदेशीर कक्षाचे अध्यक्ष श्रीधर, सह-अध्यक्ष समृद्धी हेगडे आणि इतरांनी कर्नाटकमधील शेषाद्रीपुरम पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीत विशेषतः 26 जूनला आणीबाणीच्या स्मरणार्थ आयोजित एका जाहीरसभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) होसबाळे यांनी केलेल्या विधानांचा उल्लेख आहे. जिथे त्यांनी प्रस्तावातून हे शब्द काढून टाकण्याचे आणि पुनर्विचार करण्याचे आवाहन केले होते. तक्रारीसोबत जोडलेल्या पत्रात श्रीधर यांनी होसबाळे यांनी जाहीरसभेला संबोधित करताना उघडपणे म्हटले होते की, संविधानाच्या प्रस्तावनेतील ‘समाजवादी’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द काढून टाकावेत.
राजकीयदृष्ट्या संवेदनशील कार्यक्रमात एखाद्या संघटनेच्या उच्चपदस्थ विचारवंताने केलेली ही विधाने केवळ वैचारिक भाष्य नाहीत. संवैधानिक मूल्यांचे सार्वजनिकरित्या नुकसान करण्याच्या, अशा प्रयत्नांना अत्यंत गांभीर्याने आणि तत्परतेने हाताळले पाहिजे.
यामुळे एक स्पष्ट संदेश गेला पाहिजे की, कोणीही संविधानापेक्षा वर नाही आणि असंवैधानिक पद्धतींचा किंवा संवैधानिक तत्त्वांचा भंग करण्याचा कोणताही सार्वजनिक पुरस्कार कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाईल, असे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, सीपीआयचे (एम) राज्यसभा खासदार संदोष कुमार यांनी आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत यांना पत्र लिहून दत्तात्रय होसबाळे यांच्या वक्तव्यानंतर भारतीय संविधानातील मूलभूत मूल्ये म्हणून ‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘समाजवादा’ची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखण्याची विनंती केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.