Tukaram Mundhe Transfer: डॅशिंग IAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; 'या' पदावर नियुक्ती

Tukaram Mundhe Transfer Development Commissioner Unorganized Workers : विकास आयुक्त,असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या कमी महत्त्वाच्या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे
Tukaram Mundhe Transfer
Tukaram Mundhe TransferSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: डॅशिंग सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe Transfer) यांची बदली करण्यात आली.

विकास आयुक्त,असंघटित कामगार विभागाचे विकास आयुक्त या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी यासंबंधीच पत्र काढलं आहे.

कृषी व पशुसंवर्धन खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव पदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे होती. आता ते असंघटित कामगार विभागाचे (मुंबई) विकास आयुक्त झाले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या जागी राजेश कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Tukaram Mundhe Transfer
Girish Mahajan: गिरीश महाजन यांनी पदाधिकाऱ्यांची घेतली झाडाझडती; पुन्हा चूक केल्यास...

शासनाने आपली बदली केली असून आपली नियुक्ती विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई या रिक्त पदावर केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार, भाप्रसे यांच्याकडून सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्विकारावा, असे त्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Tukaram Mundhe Transfer
Tukaram Mundhe TransferSarkarnama

प्रशासकीय व्यवस्थेत धडाडीचे, शिस्तप्रिय अधिकारी म्हणून मुंढे यांची ओळख आहे. सतरा वर्षांच्या नोकरीच्या कालावधीत त्यांची 20 वेळा बदली झाली आहे. 2005 बॅचचे ते आयएएस अधिकारी आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com