Kangana Ranaut : कंगना रनौत भाजपच्या ताब्यातील एक राज्य घालवणार? पुन्हा नको ते बडबडल्या...

Farm Laws Farmers protest Congress : भाजपने काही दिवसांपूर्वीच कंगना रनौत यांना वादग्रस्त मुद्यांवर भाष्य न करण्याबाबत तंबी दिली आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचलेला असताना भाजपच्या खासदार कंगना रनौत यांनी पुन्हा शेतकरी आंदोलनावर भाष्य केले आहे. तीन कृषी कायदे रद्द करावेत, यासाठी शेतकऱ्यांचे आंदोलन उभे राहिले होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. आता हेच कायदे पुन्हा आणावेत, असा कंगना यांचा आग्रह आहे.

कंगना रनौत यांच्या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. त्यामुळे हा मुद्दा हरियाणातील निवडणुकीच्या प्रचारात गाजण्याची शक्यता आहे. कंगना यांचे विधान भाजपसाठी अडचणीचे ठरू शकतो. कारण तीन कृषी कायद्यांविरोधात प्रामुख्याने हरियाणातील शेतकऱ्यांनी दिल्ली सीमेवर अनेक महिने आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान शेकडो शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता.

Kangana Ranaut
Tekchand Savarkar : लाडकी बहीण योजना मतांसाठीचा जुगाड! अखेर महायुतीची भानगड पुढे आली…

काय म्हणाल्या कंगना रनौत?

कृषी कायदे परत आणायला हवेत, असे सांगताना कंगना रनौत म्हणाल्या, शेतकऱ्यांनी स्वत:च ही मागणी केली पाहिजे. देशाच्या विकासात शेतकरी महत्वाचे आहेत. त्यामुळे त्यांनीच ही मागणी करायला हवी. केवळ एका राज्यातील शेतकऱ्यांनी या कायद्यांवर आक्षेप घेतला होता. मी हात जोडून विनंती करते की, हे कायदे परत आणण्याची मागणी शेतकऱ्यांनी करावी. माझ्या या विधानावरून वादही निर्माण होऊ शकतो, हे सांगायलाही कंगना विसरल्या नाहीत.

काँग्रेसकडून निशाणा

कंगना यांच्या या विधानावर काँग्रेसने टीका केली आहे. देशातील 750 हून शेतकरी शहीद झाले, तेव्हा कुठे मोदी सरकारची झोप उडाली आणि तीन काळे कायदे मागे घेतले. आता भाजपचे खासदार पुन्हा हे कायदे परत आणण्याचा प्लॅन बनवत आहेत. काँग्रेस शेतकऱ्यांसोबत आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या खासदारांनी कितीही जोर लावला तरी हे काळे कायदे पुन्हा कधीच परत येणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

Kangana Ranaut
Priyanka Gandhi : 7 वर्षांत 13 हजार एन्काऊंटर! प्रियांका गांधींनी सरकारला घेरलं...

दरम्यान, कंगना यांनी काही दिवसांपूर्वीच शेतकरी आंदोलनाचे बांग्लादेशशी कनेक्शन जोडले होते. आंदोलनाला परदेशात पैसे मिळत होते. बांग्लादेशप्रमाणेत देशात अशांतता पसरवण्याचा त्यामागे हेतू होता, अशी गंभीर विधाने कंगना यांनी केली होती. त्यावरून भाजप नेत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com